👁 21 Views

कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये ‘गणेशा मेकिंग’ स्पर्धा उत्साहात संपन्न

कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये ‘गणेशा मेकिंग’ स्पर्धा उत्साहात संपन्न


पंढरपूर (प्रतिनिधी): येथील कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी नुकतीच ‘गणेशा मेकिंग’ (गणेशमूर्ती बनविण्याची) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इयत्ता नर्सरी ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. चिमुकल्या विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्याच उत्स्फूर्त सहभागाने आणि त्यांनी स्वहस्ते साकारलेल्या विविध रूपांतील बाप्पाच्या मूर्तींमुळे ही स्पर्धा अत्यंत आनंदमयी वातावरणात संपन्न झाली.
​या विशेष कार्यक्रमाप्रसंगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या मनोगतातून त्यांनी गणपती उत्सवाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले, तसेच या सणातून मिळणारी बुद्धी आणि पर्यावरणा विषयीची शिकवण विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
​यावेळी संस्थेचे चेअरमन मा. श्री. रोहनजी परिचारक यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत सर्वांना आगामी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
​या शानदार कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *