👁 210 Views

कर्मयोगी विद्यानिकेतन आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने ‘तरुण विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर प्रबोधन​

कर्मयोगी विद्यानिकेतन आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने ‘तरुण विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर प्रबोधन​

सध्याच्या स्पर्धात्मक युगात आणि बदलत्या जीवनशैलीत शालेय विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा मोठा ताण असतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तरुण विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य’ या महत्त्वपूर्ण विषयावर नुकतेच एका विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.


​या कार्यक्रमात प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध मानोसोपचार तज्ञ डॉ.शेरॉन भोपटकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
त्यांनी वाढती स्पर्धा, सोशल मीडियाचा व मोबाईलचा अतिवापर, आणि अभ्यासाचा ताण यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. तणावमुक्तीसाठी सकारात्मक दृष्टिकोन कसा बाळगावा, तसेच नैराश्य किंवा चिंता वाटल्यास शिक्षकांशी व पालकांशी मोकळेपणाने कसे बोलावे, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. “शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही जपणे काळाची गरज आहे,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
​लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम्स सहकार्याने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून, त्यांच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे असे प्रतिपादन कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शनी सरदेसाई यांनी केले. तसेच या स्तुत्य उपक्रमाबद्दल पालकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे असेही त्यांनी सांगितले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक व रजिस्ट्रार गणेश वाळके यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
​या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *