अक्षय विश्वनाथ जामले (वय 27), विश्वनाथ परवती जामले
(वय 55), महिला (वय 48, रा. हडपसर. मूळ रा. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी माहेरहून हुंडा आणला नाही.
तसेच त्या काम करत नाहीत. सकाळी उठण्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला.
त्यांना वेळोवेळी शिवीगाळ करून हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.



