👁 8 Views

मोटार सायकल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक

 

प्रतीक मोहिते, वय 30 वर्षे, रा. येरवडा आणि ओमकार तांदळे, वय 20 वर्षे, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड पुणे या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे.


पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वाहन चोरीचे घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने 25 डिसेंबर 2022 रोजी युनिट 5 मधील स्टाफ ने मुंढवा भागात सापळा लावून हिरो सीडी डीलक्स मोटर सायकलसह संशयितरित्या थांबलेले इसम प्रतीक मोहिते, वय 30 वर्षे, रा. येरवडा आणि ओमकार तांदळे, वय 20 वर्षे, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड पुणे यांना ताब्यात घेतले.


त्यांच्याकडेच कौशल्यपूर्वक तपास करत असताना 2.58 लाख रुपये किंमतीच्या एकूण सात मोटरसायकली व वाहन चोरी करण्यासाठी वापरलेल्या चाव्या, स्क्रू ड्रायव्हर व एक कानस जप्त करण्यात आलेला आहे. जप्त मोटरसायकलीमध्ये मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकाच दिवशी चोरीस गेलेल्या तीन मोटरसायकलींचा समावेश आहे.


ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्य्क पोलीस निरीक्षक  कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार रमेश साबळे दया शेगर, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे, अश्रूबा मोराळे, दीपक लांडगे, राजस शेख, किशोर पोटे, अमित कांबळे, पांडुरंग कांबळे, दाऊद सय्यद, विनोद शिवले अकबर शेख, शशिकांत नाळे, राहुल ढमढेरे, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *