पंढरपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेमध्ये गणित सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेला बजार डे अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या बाजार मध्ये प्रशालेच्या 3री ते 5वी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे साहित्य विक्री साठी ठेवले होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीनिवासन रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या सौ. प्रियदर्शनी सरदेसाई यांच्या हस्ते करून झाली. यानंतर प्रशालेच्या प्रांगणामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बाजाराला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांनी मनसोक्त खरेदीचा अनुभव घेतला. तसेच सर्व शिक्षक व प्रशालेच्या प्राचार्या यांनी देखील भाजी व इतर साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. या बजार डे निमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गणितीय प्रक्रिया तसेच व्यवहार कसे केले जातात हे समजून आले. या बजार डे साठी सर्व पालकांनी आपल्या पाल्यास उत्साहाने मदत केली.
गणित सप्ताहाचा दुसरा दिवस इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गणितीय वेशभूषा व गणितीय संवादाद्वारे सर्व विद्यार्थ्यांना गणिताचे महत्त्व पटवून देण्याचा खूप छान प्रयत्न केला. तिसऱ्या दिवशी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी गणितावर आधारित नाट्यछटा तसेच वैशिष्ट्यपूर्ण असे नृत्य सादर केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. रोहन परिचारक व प्रशालेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शनी सरदेसाई हे उपस्थित होते. तसेच चेअरमन श्री.रोहन परिचारक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सप्ताहाचे आयोजन गणित विभाग प्रमुख श्री. सुधीर गोडसे यांनी केले तर सर्व गणित शिक्षक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.आभार श्री. आकाश साबळे यांनी मानले.



