गंगापुर वैजापूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक न्यायालयाचा गेट समोर रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान मोटरसायकल व मालवाहतुक ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात सिद्धनाथ वाडगाव येथील रुग्णालयात कार्यरत असलेले सचिन दिनकर सातपुते (४३) हे मृत झाले आहे.
सातपुते जागरण गोंधळाचा कार्यक्रमातुन रात्री १२: ३० चा दरम्यान घरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातील न्यायालयासमोर (एम पी ०९ एच एच ९८७९ ) क्रमांकाचा ट्रकला दुचाकी (एम एच २० ए यू ८९३०) ची मागून धडक बसल्याने दुचाकीवरील सचिन सातपुते यांचा डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, सतिष पाटील, आकाश गवारे, जय गायकवाड यांनी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.
प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणजित मावळली सातपुते यांच्या अपघाती मृत्युमुळे गंगापूर शहरासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पाश्चात आई- वडील पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.



