पंढरपूरची मुद्रण परंपरा खूप जुनी – रमेश घळसासी (जेष्ठ पत्रकार)

पंढरपूरची मुद्रण परंपरा खूप जुनी – रमेश घळसासी (जेष्ठ पत्रकार)

पंढरपूरची मुद्रण परंपरा खूप जुनी, अगदी देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीची आहे.  मुद्रण क्षेत्रात नवनवीन बदल झाले तरी नव्या-जुन्याचा संगम साधत होतकरु तरुणांनी ही  परंपरा सांभाळून ठेवली आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार रमेश घळसासी यांनी व्यक्त केले.

  ‘जागतिक मुद्रण दिनानिमित्त’   काल रात्री येथील नुकतेच सुरु झालेल्या ‘खाद्यसंस्कृती रेस्टो’ मध्ये  ‘”पंढरपूर युवा मुद्रक संघटने'”  च्या वतीने नव्या पिढीच्या कष्टाळू, प्रामाणिक  मुद्रण-व्यावसायिकांच्या ‘ गौरवपूर्ण ‘ सन्मानचिह्न देवून यथोचित सन्मान जेष्ठ पत्रकार रमेश घळसासी यांचे हस्ते केला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, पंढरीच्या डीटीपी क्षेत्राचे यशस्वी कर्ते अतुल बहिरट  होते.

याप्रसंगी युवा मुद्रक संघाचे जनक अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, सचिव रामकृष्ण बिडकर, बबनराव सुरवसे, श्रीराम रसाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे आधारस्तंभ मंदार केसकर यांनी केले. आभार प्रदर्शन रामकृष्ण बिडकर यांनी केले.

 अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत, येथील मुद्रण क्षेत्रातील सचोटी- प्रामाणिकपणा, गुणवत्ता वाढीस लावणाऱ्या कष्टकरी मुद्रकांचा सन्मान केल्याचे समाधान मिळाले.

       यावेळी संजय यादव,  नाना यादव, रमेश यादव, मकरंद वैद्य, गजानन कोलगी, सोमा शिंदे, शंकर  वायचळ, प्रदीप बोरकर  आदी पंढरपुरातील मुद्रक उपस्थित होते.

◾ सन्मानप्राप्त युवा मुद्रक :

 सुरज कोठारी, अमोल चव्हाण, श्रीनाथ साळुंखे, मंदार केसकर, रामकृष्ण बिडकर, शिवम पाटील ,सुरज सुरवसे,  स्वप्नील यादव, शुभम परदेशी, श्रीराम रसाळ, संतोष गोंजारी, विद्येन्द्र मोरे, गणेश वायचळ, शितल कोठारी, आकाश साळुंखे इत्यादी..

🔹🔹

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *