👁 3 Views

pandharpur : कर्मयोगी जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाचा ८९.२८ टक्के निकाल

pandharpur : कर्मयोगी जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाचा ८९.२८ टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून घेण्यात आलेल्या द्वितीय वर्षाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग शेळवे महाविद्यालयाचा निकाल ८९.२८% इतका लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक प्रतीक्षा लक्ष्मण सोनवणे ८६.७१%, द्वितीय क्रमांक स्नेहा भारत पवार ८६.००%, तृतीय क्रमांक पूजा तानाजी जाधव ८५.१४% यांनी मिळवला आहे.


याबद्दल अधिक माहिती देताना नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गुरुराज कुलकर्णी म्हणाले की कर्मयोगी जी एन एम नर्सिंग महाविद्यालयाने द्वितीय वर्षाचा घवघवीत यश संपादन केले आहे. सुसज्ज लॅब, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक मशीन्स व विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणारा नियमिय अभ्यास व वैयक्तिक लक्ष हेच या यशामागचे गमक आहे असे सांगून त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, कर्मयोगी इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी. पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे,रजिस्ट्रार गणेश वाळके,कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.एस एम जाधव, तसेच सर्व प्राध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *