👁 20 Views

भीषण अपघात! पोलिस अधिकाऱ्याने 6 वाहनांना उडवलं ; दारूच्या नशेत असल्याचा संशय

 

दिल्लीच्या द्वारका रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिल्लीच्या द्वारका रोडवर सहा गाड्यांना उडवलं

पोलीस अधिकारी दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला जात आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार एका दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात या अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संबंधित पोलीस अधिकारी हा जेव्हा अपघात झाला तेव्हा आपल्या खासगी कारने प्रवास करत होता. याचवेळी त्याने सहा वाहनांना उडवलं या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये संबंधित अधिकाऱ्यासोबतच अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, याबाबत त्यांच्या कुटुंबांना माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जर संबंधित अधिकाऱ्याने आपघातावेळी दारू पिल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरोधाक कडक कारवाई करण्यात येईल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *