👁 9 Views

किरकोळ वाद अन् मित्रासोबत भयानक कृत्य,

 

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जागेच्या घरगुती कारणांवरून पुतण्याने चुलत भाऊ आणि काकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना यवतमाळमध्ये नुकतीच घडली.


यात एकाचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यातही धक्कादायक उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा खून केला.  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पावनळ करंजाळी रस्त्यावरती एक मृतदेह सापडून आला होता.


हा खूनाचा प्रकार असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांत किशोर परब असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. किरकोळ वादातून त्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जयकिसन ओमप्रकाश सिंग याला अटक केली आहे.

संशयित हा मृताचा मित्र आहे. मृत सुशांतचा मुंबई येथील मित्र संशयित जयकिसन ओमप्रकाश सिंह याला काही तासांत दापोली पोलिसांनी खेड येथून एका लॉजमधून ताब्यात घेतले आहे. मात्र, हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे समजू शकलेले नाही. 2 जानेवारीला सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास करंजाळी रस्त्यावर एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.


याबाबतची माहिती दापोली पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली. करंजाळी येथे आपल्या आजीकडे राहणाऱ्या सुशांत किशोर परब याचाच हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *