सासू सासरे आणि दिराने घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेला वारंवार मानसिक, शारीरिक त्रास दिल्याने त्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे उघडकीस आली.
स्वप्नाली संग्राम हजारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी सासू-सासरे व दिराच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोपळे ता. पंढरपूर येथील तुषार सुनील कोळेकर यांची बहीण स्वप्नाली हिचे लग्न २७ एप्रिल २०१६ मध्ये मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील संग्राम सदाशिव हजारे यांच्यासोबत झाले होते. स्वप्नाली हीस बरेच वर्ष मुलबाळ होत नव्हते. दरम्यान तिला सासू, सासरे त्रास देत होते. उपचारानंतर तिला एक मुलगा व एक मुलगी झाली. स्वप्नाली हीचे पती संग्राम हजारे हे रेल्वेत गॅंगमन म्हणून नोकरीत आहेत. तसेच ट्रक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात.