👁 8 Views

आजारी काकांना भेटून निघाले अन् वाटेत मृत्यूने गाठले

 

औरंगाबादमध्ये मन हेलावून टाकणारी अपघाताची बातमी समोर आली आहे. शस्त्रक्रिया झालेल्या काकाला भेटायला आलेल्या कुटुंबाचा औरंगाबादजवळ कार अपघात झाला.


अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 8 वर्षाच्या चिमुकलीसह पत्नी गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील मिटमिटा परिसरात कारला अपघात झाला आहे. त्रिंबक विष्णू वाघ असं अपघातात मृत्यू झाल्या व्यक्तीचे नाव आहे.


कन्नडवरून त्रिंबक विष्णू वाघ हे आपल्या पत्नी आणि 8 वर्षीय मुलीसह त्यांच्या काकाच्या झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना बघायला आले होते. त्रिंबक वाघ हे आपल्या दुचाकीवरून आले होते. काकांच्या तब्येतीची विचारपूस ते पुन्हा आपल्या गावी परत जात होते. औरंगाबादच्या मिटमिटा पडेगाव परिसरात आल्यानंतर ओव्हरटेक करण्याच्या नादात एका कारने त्यांना जोराची धडक दिली.अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले त्रिंबक वाघ यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केलं. या अपघातात त्यांची 8 वर्षीय चिमुकली आणि पत्नी गंभीर जखमी आहे.


त्यांच्यावर घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या या अपघाती निधनामुळे वाघ कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, बीडमध्ये सुद्धा अपघाताची दुर्दैवी घटना घडली. मॉर्निंगवॉक करणाऱ्यासाठी गेलेल्या सेवानिवृत कर्मचाऱ्यांला स्कार्पिओ कारने धडक दिली.

बीडच्या परळी शहरात इटके कॉर्नरजवळ मॉर्निंग वॉक करताना सेवानिवृत कर्मचारी यांना स्कार्पिओ गाडीने जोराची धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते पण उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दादाराव म्हस्के असं मयत व्यक्तीच नावं आहे. या प्रकरणी गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *