प्रेमप्रकरणातून मुंबईत एक भयानक घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून जिवलग मित्रानेच मित्रावर कोयत्याने जीवघेणा केल्याची धक्कादायक मुंबईतील मालाड पोलीस ठाणे अंतर्गत गोरेगाव परिसरात घडली आहे.
मुंबई उपनगरातील गोरेगाव परिसरातील पाटकर महाविद्यालयात ही धक्कादाक घटना घडली आहे. जयेश सावंत आणि आयुष खेडकर हे दोघे जीवलग मित्र होते. दोघेही एकाच वेळी एकाच तरुणीच्या प्रेमात पडले आणि नेमके याच कारणातून दोघांच्या जीवलग मैत्रीचा करुण अंत झाला.
जयेश आणि आयुषचे आपल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडले. याच प्रेमाच्या त्रिकोणातून आपली आवडती मुलगी कायमची आपली व्हावी यासाठी दोघांची धडपड सुरु होती.
याच कारणातून जयेशला आपल्या प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी आयुषने कोयत्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जयेश गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत जयेशला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हल्ला करणाऱ्या आयुष खेडकरला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.



