👁 4 Views

इंदापूरात आईनेच दोन चिमुकल्यांची गळा दाबुन हत्या केली

इंदापूरात आईनेच दोन चिमुकल्यांची गळा दाबुन हत्या केली

माता न तू वैरीणी. ही फक्त म्हण आत्तापर्यंत ऐकायला मिळत होती. परंतु प्रत्यक्षात ती आता अनेक वेळा अनुभवायला मिळत आहे. आज दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गाव हादरले.

वेशीवर असणाऱ्या इंदापूर तालुक्यातही खळबळ उडाली. स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्तीवर सकाळी सकाळी लोकांची गर्दी झाली कारण घटनाच तशी होती.

गावातील शिंदे वस्तीवर दुर्योधन बाबासाहेब मिंडे त्यांचे घर आहे. या घरी आज एकाच वेळी आईनेच दोन वर्षाच्या मुलीची व एक वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली एवढ्यावरच न थांबता तिने धारदार शस्त्र घेऊन नवऱ्याच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले. तिला एकाच वेळी घर संपवायचं होतं असंच यातून दिसून येते.

या घटनेत दुर्योधन बाबासाहेब मिंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बारामतीतील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर दोन वर्षाची पियू दुर्योधन मिंडे व दोन वर्षाचा शंभू दुर्योधन मिंडे या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला. या दोघांचाही गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. दुर्योधन यांची पत्नी कोमल दुर्योधन मिंडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

स्वामी चिंचोली येथील शिंदे वस्ती येथे हा प्रकार घडला. अगोदर एका खोलीमध्ये नेऊन दोन्ही मुलांचा गाळा दाबून खून केला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने दुर्योधन याच्यावर वार केले. यामध्ये मानेवर व डोक्यावर वार झाल्याने दुर्योधन हे गंभीर जखमी झाले. पत्नीनेच घर संपवण्याच्या केलेल्या या कृतीने सारे जण हादरून गेले आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *