👁 4 Views

3 दिवस बेपत्ता अन् गाडीत डायरी, PSI ने लोणावळ्यात घेतला गळफास

3 दिवस बेपत्ता अन् गाडीत डायरी, PSI ने लोणावळ्यात घेतला गळफास

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

टायगर पॉईंटलगत त्यांनी झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडालेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णा गुंजाळ असं पोलीस उपनिरीक्षक यांचं नाव आहे. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. मात्र तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. तसंच त्यांचा संपर्क ही होत नव्हता. अशातचं आज शुक्रवारी दुपारी त्यांनी गळफास घेतल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली.

टायगर पॉइंटवर त्यांची गाडी सुद्धा आढळलेली आहे. या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचं कारण दडलेलं असू शकतं. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचलेले असून खडकी पोलीस ही घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. पोलिसांनी अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह खाली उतरवला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. अण्णा गुंजाळ यांनी आत्महत्या केल्यामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *