👁 5 Views

पुणे – सोलापूर महामार्गावर एसटी – कारचा भीषण अपघात

 

-सोलापूर महामार्गावर एसटी, कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एसटी बसचा ब्रेक अचानकपणे फेल झाल्यामुळे बसने पुढील कार आणि ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.


अपघातात कार आणि ट्रकचे मोठे नुकसान देखील झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट-ठाणे या (एमएच १४ बीटी २६९३) ही गाडी पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होती. बस थेऊर फाट्याजवळ आली असता बसचा अचानक ब्रेक फेल झाला आणि बसने समोर असलेल्या कार आणि ट्रकला जोरदार धडक दिली. मात्र, सुदैवाने या अपघातात चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील ४० प्रवाशांचे प्राण वाचले. परंतु या अपघातात रस्त्याच्या दुभाजकाला रंग देणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. तसेच त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. या अपघातामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, आता पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडून या घटनेची पुढील तपासणी केली जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *