👁 6 Views

सोलापूर: पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे तालुका कृषी कार्यालया समोर बेमुदत उपोषण

सोलापूर: पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे तालुका कृषी कार्यालया समोर बेमुदत उपोषण

सन 2023/24 सालात भरलेल्या पिक विम्याची रक्कम मिळाली नाही, बोगस पंचनामे करून पिक विमा हडप करणाऱ्या पिकविमा अधिकारी व कृषी प्रतिनिधी यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, यासह अन्य मागण्यासाठी मोहोळ तालुका कृषी कार्यालया समोर औंढी ता मोहोळ येथील शेतकऱ्यांनी शनिवार ता 25 पासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे.

उपोषण कर्ते शेतकरी हनुमंत विठ्ठल साळुंखे रा औंढी यांनी दिलेल्या माहिती नुसार,औंढी ता मोहोळ येथील ज्ञानेश्वर नरसू पडसाळकर, राजेंद्र बब्रुवाहन भुसे, आनंद पांडुरंग बाबर, पांडुरंग मच्छिंद्र मोटे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी सन 2023/ 24 साली कांदा व निकषात बसणाऱ्या अन्य पिकांचा पीक विमा भरला होता.

वारंवार मागणी करून खेलपाटे घालूनही शेतकऱ्यांना आश्वासना शिवाय काहीही मिळाले नाही. तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांच्याकडे कैफियत मांडून ही त्यांनी तुम्ही व पिक विमा कंपनी पहा असे सांगून हात झटकले. शेतकऱ्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागून ही दिली जात नाही.

त्यासाठी पुणे येथील माहिती आयुक्ताकडे अपीलही दाखल केले आहे. मात्र कोणीही दखल घेण्यास तयार नाही. धक्कादायक बाब म्हणजे मृत शेतकऱ्याच्या नावावर विम्याचे पैसे वर्ग झाल्याचे हनुमंत साळुंखे यांनी सांगितले

, मात्र जिवंत असणाऱ्यांना झगडावे लागत आहे. औंढी येथील सुमारे 250 ते 275 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. त्यांनी दिलेली पूर्वसूचना आम्हाला दाखवावी अशी ही मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे. प्रतिक्रिया——

शेतकरी व कृषी अधिकारी यांची गेल्या दोन दिवसापूर्वी बैठक आयोजित केली होती, त्यात कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना लेखी देण्या संदर्भात सूचना दिली आहे.

सचीन मुळीक, तहसीलदार, मोहोळ

शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली नाही, तरीही त्यांच्याकडून माहिती मागवली आहे.माहिती आल्यानंतर योग्य ती कारवाई करू.

अतुल पवार—

तालुका कृषी अधिकारी मोहोळ

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *