👁 6 Views

सख्ख्या भावानेच केली मोठ्या भावाची हत्या

 

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर साहेबराव कराड ४० रा.गंगापूर कॅनॉल जवळ, सरकारी नर्सरी समोर कराड मळा, मखमलाबाद गाव हे कुटुंबा समवेत राहतात.


 गुरुवार (१२) रोजी आई लंकाबाई साहेबराव कराड यांनी लहान मुलगा दिपक यास फोन करून सांगितले की, रात्री ज्ञानेश्वर घरी पोहचलो नाही.


त्यानंतर दिपक हा मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने सकाळी सात वाजेच्या सुमारास शोध घेत असता, ज्ञानेश्वर हा दुचाकी सह गायकवाड मळ्यासमोरील पाटात पडलेला आढळून आला. 

त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन मयत झाल्याचे दिसून आल्याने ही खबर म्हसरूळ पोलिसांना दिली असता म्हसरूळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातलगांनी व्यक्त केल्याने पोलिसानी त्या दिशेने तपास सुरू केला होता. 


पोलिसांनी अधिक तपास केला असता मयत ज्ञानेश्वर कराड यांचे वडील साहेबराव यांचे दोन लग्न झाले असून त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी तर दुसऱ्या पत्नीपासून ज्ञानेश्वर आणि दीपक असे दोन मुले झाले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *