
बार्शी : माझी पत्नी आजारी असून माझ्याकडे जुने सोने आहे, असे सांगून दोघांनी मिळून दोन किलो बनावट सोने देऊन एकाची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवार (दि. 9) रोजी सव्वा बारा वाजता बार्शीतील शुभाष नगर भागात घडला.
याप्रकरणी बिट्टू (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य एक अनोळखी महिला अशा दोघांवर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल जैन (वय 38, रा. अनंत निवास, स्वामी समर्थ मंदीराजवळ, पंकज नगर बार्शी) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जैन यांचे हिरामेठ हॉस्पिटल येथे हार्डवेअरचे दुकान असून 7 जानेवारीला एक अनोळखी पुरुष बिट्टू (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) व एक अनोळखी महिला दुकानात बकेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी बकेट घेतल्यावर त्यांच्या वडीलांना म्हणाला होता की, माझी पत्नी आजारी आहे तिला दवाखान्यात दाखवायचे आहे, तिच्या उपचारासाठी मला पैशाची गरज आहे, माझेकडे जुने सापडलेले सोने आहे ते मला विकायचे आहे कुणी घेणार असेल तर, मला कळवा असे म्हणुन त्याने त्यांचा मोबाईल नंबर दिला व त्याने वडीलांजवळ 1 सोन्याचा मणी दिला व तो निघुन गेला होता. त्यानंतर सोन्याचा मनी फिर्यदिने सोनाराकडे चेक केला असता तो मणी सोन्याचाच होता. त्यानंतर 9 जानेवारी रोजी दुपारी ते दुकानामध्ये काम करीत असताना दुकानामध्ये मागील वेळी सोन्याचा मणी दिलेले तेच एक अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिला दुकानात आले तेंव्हा त्याने आणखीन 2 सोन्याचे मणी दिले त्यानंतर ते मणी चेक करण्यासाठी दिले त्यांनी ते सोनारकडे चेक केले असता, ते मणी सोन्याचेच होते.
तेव्हा खात्री झाली की, ते सोनेच आहे. त्यामुळे आम्ही त्या एक अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिलाकडुन यांना माझ्या जवळील दहा लाख रुपये रोख रक्कम देऊन त्यांचेकडील 2 किलो वजनाचे सोन्याच्या मण्याचे माळा घेतले व ते दोघेही तेथुन निघुन गेले, दिलेले सोने चेक केले असता ते सोने बनावट असल्याबाबत खात्री झाली. बनावट सोने देणार्या दोघांचा शोध घेतला असता तो फोन बंद लागत होता. त्यावेळी खात्री झाली की, अनोळखी पुरुष व अनोळखी महिला यांनी 10 लाखांची फसवणुक केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहर पोलिस करत आहेत.

