👁 8 Views

कॅनडा देशात ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना करिअर च्या अनेक संधी- अखिलेश अभ्यंकर

पंढरपूर: प्रतिनिधी

स्कील असलेल्या विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या अनेक संधी कॅनडा देशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. कॅनडा देशाची लोकसंख्या कमी आहे. या देशात नागरिकांना औषधोपचार तसेच १ ते १२ शिक्षण मोफत दिले जात आहे.  कॅनरा देश छोटा असुन त्या देशात पाच विद्यापीठ आहे. कॅनरा मध्ये कोणते काम सहजरीत्या उपलब्ध होते. या देशात नोकरी निमित्त जात असताना इंग्रजी भाषा बोलता येणे खुप महत्वपूर्ण आहे. 


स्वतःच्या कौशल्यातुन पैसे कमविता आले पाहीजे. कॅनडा देशात पैसू भरपूर मिळतो पण त्यापटीत खर्च हि खुप असतो. बाहेरील देशातील पैसा भारतात येणे आवश्यक आहे. कॅनडा मध्ये जन्मलेल्या मुलांना शासन अनुदान देते. 


कमी वयात नोकरी मिळविणे आवश्यक आहे. एकमेकांचे पाय ओढू नका. स्वतःच्या प्रगती वर विश्वास ठवून प्लॅनिंग करून करिअर करा या देशात ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना अनेक करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे मत अखिलेश अभ्यंकर यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.

  एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये मंगळवार दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी प्रो. डाॅ. एच. के. अभ्यंकर व अखिलेश अभ्यंकर यांचे “महासागर आणि ध्रुवांच्या पलीकडे” याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाची सुरुवात प्रो. डाॅ. एच. के. अभ्यंकर,  अखिलेश अभ्यंकर, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. रोहन नवले आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. 


या दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे सर व इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले सर यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

     यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर . डाॅ. एच. के. अभ्यंकर व अखिलेश अभ्यंकर यांनी उत्तरे दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *