👁 5 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये एन.बी.ए. संदर्भात दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयामध्ये एन. बी.ए. च्या संदर्भात गुरुवार दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी “एन. बी. ए. ॲक्रिडेशन अँड एस. ए. आर. प्रिपेरेशन” या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्यची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.


   या कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. दरम्यान दोन दिवशीय कार्यशाळेतील मार्गदर्शक यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

   या कार्यशाळेत एन. बी. ए. ची मार्गदर्शक तत्त्वे ही व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नेहमीच योग्य दिशा देणारी असतात. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय मागिल काही वर्षांपासून  तंत्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट काम करीत आहे.


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, आधुनिक तंत्रशिक्षण तसेच जागतिक पातळीवर असणारी सक्षमता या अनुषंगाने एन.बी.ए. च्या मार्गदर्शक सुचनांचा फायदा महाविद्यालयात होतो. या दृष्टिकोनातून महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या माहिती मध्ये व ज्ञानामध्ये भर पडावी या हेतूने या  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ही कार्यशाळा दोन दिवसात चार सञांमध्ये संपन्न झाली. पहिल्या सञांमध्ये डाॅ. वाय. पी. रड्डी यांनी एन.बी.ए चे महत्व सांगून त्याचा विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेला कसा फायदा आहे याबद्दल एन.बी.ए च्या पहिल्या निकष मध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो, व्हिजन मिशन, प्रोग्रामर आउटकम आदींची माहीती दिली.

  दुसर्‍या सञात डाॅ. एम. बी. माळी यांनी एन.बी.ए निकष दोन आणि तीन मधील प्रत्येकी १२० मार्क्सचे प्रोग्राम अभ्यासक्रम आणि टिचिंग लर्निग प्रोसेस याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली.


    दुसर्‍या दिवसातील पहिला सञात डाॅ. ज्ञानेश्वर मंञी यांनी एन.बी.ए निकष चार मधील स्टुडंट्स परफॉर्मन्स आणि फॅकल्टी इन्फॉर्मेशन अँड काॅनट्रीबुशन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

  डाॅ. भाग्येश देशमुख यांनी दुसर्‍या दिवसातील दुसर्‍या सञात एस.ए. आर. चा रिपोर्ट कसा भरावा. यासंदर्भात प्रॅक्टिकली मार्गदर्शक केले. एन.बी.ए. चे व्हाल्युयटर कसे प्रश्न विचारतात याबद्दल त्यांनी त्यांचा अनुभव उपस्थित शिक्षकांवर समोर सांगितला. प्रत्येक शिक्षकांने एस.ए.आर. मार्गदर्शिका व्यवस्थित वाचून अभ्यासणे आवश्यक आहे. जो पर्यंत स्वतः करत नाही तो पर्यंत समजत नाही अशा प्रकारे हसत खेळत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  या कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व शिक्षक सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डाॅ. श्याम कुलकर्णी व डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी काम पाहिले तर सहभागी प्राध्यापकांचे आभार डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी मानले. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *