- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 20 september 2017
ऊस उत्पादकांच्या प्रति आपलेपणाची भावना असणारा व नाविन्याचा शोध घेत ऊस उत्पादकांच्या ऊस उत्पादकतेत वाढ व्हावी . यासाठी नवनवीन योजना राबविणारा युटोपियन शुगर्स हा साखर कारखानदारीत आपला वेगळा आदर्श निर्माण करीत असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ : अजित इंगळे यांनी केले .
युटोपियन शुगर्स आयोजित हुमणी उच्चाटन पर कार्यक्रमात श्री . इंगळे हे बोलत होते . युटोपियन शुगर्स ने हुमणी या रोगापासून ऊसाचे सरंक्षण व्हावे . याकरिता आष्टी , पेनूर , पापरी , काथेवाडी ;गोटेवाडी , सय्यदवरवडे व तुंगत येथील आयोजित चर्च्या सत्रामध्ये डॉ : इंगळे यांनी थेट ऊस उत्पादकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले . पुढे बोलताना डॉ : इंगळे म्हणाले पावसाच्या लहरीपणामुळे जून च्या सुरुवातीस खंड पडल्यामुळे मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील बऱ्याच ऊस उत्पादकांच्या ऊसास हुमणी आळीचा पादुर्भाव झाला आहे .
त्यामुळे ऊस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे . ऊस उत्पादकांच्या प्रति नेहमीच संवेदनशील असणाऱ्या युटोपियन शुगर्स टीमने या हुमणी आळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकात्मित किड व्यवस्थापन या योजनेमधून जैविक कीटक नाशक , रासायनिक किटक नाशक व मित्र किडींचा वापर करून युटोपियनच्या ऊस उत्पादकांची ऊस उत्पादकता वाढावी यासाठी युटोपियन टीमने सदर कार्यक्रमाचे आयोजन करून आपली जागृकता कायम ठेवली आहे .
यावेळी स्वागत पर प्रास्ताविक मध्ये युटोपियन शुगर्सचे संस्थापक चेअरमन उमेशराव परिचारक म्हणाले कि, सततच्या दुष्काळामुळे अडचणीत असणाऱ्या ऊस उत्पादकांची प्रति एकरी ऊस उत्पादकता वाढावी व ऊस उत्पादकांचे आर्थिक जीवनमान उंचवावे .यासाठी आपला युटोपियन शुगर्स कारखाना नेहमीच प्रयत्नशील असून त्यासाठी स्वतंत्र असे कृषी सेवा केंद्र उभा करण्याचा आमचा मानस आहे .
फोटो ओळी :
हुमणी किड रोगाविषयीचे प्रास्ताविक दाखवताना आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉ : अजित इंगळे यांच्या समवेत युटोपियन शुगर्सचे संस्थापक चेअरमन उमेशराव परिचारक व कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील दिसत आहेत
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

