👁 11 Views

‘अ ब क’ या मराठी चित्रपटातील प्रमुख बालकलाकाराची भुमिका साकारतेय पंढरीची ‘गौरी’ नगरसेवक विक्रम शिरसट यांची कन्या रूपेरी पडद्यावर

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 21 september  2017 

पंढरपूर  (प्रतिनिधी) येथील नगरसेवक विक्रम शिरसट यांची कन्या   कु.गौरी हिची ’अ ब क’ या मराठी चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून सिलेक्शन झाले आहे. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या थीमवर आधारित या चित्रपटासाठी कु.गौरी हिचे चित्रीकरण नुकतेच सासवड येथे पार पडलेे. गौरी ही पंढरीतील माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट यांची नात तर नगरसेवक विक्रम शिरसट यांची एक वर्षाची कन्या आहे. तिची स्क्रीन टेस्ट घेतल्यानंतर या चित्रपटातील एका प्रमुख बालकलाकाराच्या पात्रातील भूमिकेसाठी ती परफेक्ट असल्याचे आढळून आले व तिची निवड झाली.
‘‘मुलींचा जन्मदर वाढवण्यासोबतच मुलींचे उत्तम संगोपन होणे व त्यांना उच्चशिक्षित करणे ही काळाची खरी गरज आहे. हा अनमोल संदेश या चित्रपटाद्वारे देण्यात येणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर रामकुमार शेंडगे  यांचेकडून वरील माहिती मिळताच दिग्गज कलाकार असलेल्या या चित्रपटामध्ये माझ्या मुलीने अभिनय करावा अशी ईच्छा निर्माण झाली. समाजाला एक चांगला संदेश देणार्‍या या चित्रपटातील प्रमुख बालकलाकाराच्या  भूमिकेसाठी गौरीची निवड झाल्याबद्दल आनंद वाटला.’’ अशी प्रतिक्रिया नगरसेवक विक्रम शिरसट यांनी दिली.
या चित्रपटाचे आर्टिस्ट कास्टींग डायरेक्टर सुनील हुमने हे असून कलाकार पुढीलप्रमाणे आहेत. सनी पवार, साहील जोशी, गौरी शिरसट, मैथली पटवर्धन , आर्या घारे, तनीस भोसले, भक्ति चव्हाण, कमलेश सावंत, सतीश पूलेकर, विजय पाटकर, प्रेमा किरण, सविता मालपेकर, सुनिल शेट्टी, प्रशांत तपस्वी, तमन्ना भाटिया, मकरंद देशपांडे आदी नामवंत कलाकारांच्या कसदार अभिनयातून साकारलेल्या ‘अ ब क’ या चित्रपटाची प्रतीक्षा तमाम मराठी प्रेक्षकांना आहे.  
फोटो ओळ:- ‘अ ब क’ या चित्रपटाचे चित्रीकरण सासवड येथे नुकतेच संपन्न झाले. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, पंढरीची बालकलाकार गौरी व वडील नगरसेवक विक्रम शिरसट, आई सौ.दिव्या शिरसट आदी.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *