👁 7 Views

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे संविधानिक आरक्षण संपविण्याचे षडयंत्र या विषयावर चर्चासत्र संपन्न

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 24 september  2017 


पंढरपूर(प्रतिनिधी) मा. मुंबई उच्च न्यायालयाने दि.04 ऑगस्ट 2017 रोजी महाराष्ट्र शासनाचा दि.25 मे 2004 चा सर्व टप्प्यावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देणेचा शासन निर्णय बेकायदेशीर ठरवून दि.25 मे 2004 रोजी जे मागासवर्गीय कर्मचारी ज्या पदावर कार्यरत होते त्यांना त्याच पदावर पदावनत(रिवर्ट) करण्यास सांगितले आहे. निर्णयाची पार्श्‍वभूमी व पुढील वाटचाल या संदर्भात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना पंढरपूर विभाग यांनी संविधानिक आरक्षण संपविण्याचे षडःयंत्र या विषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते.
 ही सभा रविवार दि.17/09/2017 रोजी दुपारी 2:00 वाजता संत गाडगे महाराज मठ, स्टेशन रोड, पंढरपूर येथे पार पडली. सदर सभेचे प्रास्ताविक वरील संघटनेचे सोलापूर मंडलाचे सचिव मा.पी.एल. जाधव यांनी मांडले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महावितरण पंढरपूर ग्रामीण उपविभागाचे अभियंता श्री.संतोष सोनवणे हे होते. प्रमुख मार्गदर्शन मा.हेमंत ताकपेरे(बारामती परिमंडळ सचिव) यांनी केले. या निर्णयामुळे महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील सर्व वेतनश्रेणीमधील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, भटक्या-विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांचे पदोन्नतीमधील आरक्षण धोक्यात आले आहे व त्यांना मिळालेल्या घटनात्मक सन्मानाचे रुपांतर अवमानात करण्यासाठी आरक्षण विरोधी शक्ती एकवटल्या आहेत. या निर्णयाच्या विरोधात मा.सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करुन न्यायालयीन लढा उभारताना मोठ्या प्रमाणात जनआंदोबन उभारण्याची आवश्यकता आहे असे मत यावेळी मा.हेमंत ताकपेरे यांनी मांडले. 

गणेश वगरे(सहा.अभयंता),अजित मोरे, विजय कांबळे, प्रविण कांबळे(वरिष्ठ लिपिक)व सुहास सोनवणे यांनी रु.5000/- चा धनादेश मा.हेमंत ताकपेरे यांचेकडे सुपूर्द केला. याप्रसंकगी श्री.तुषार व्हनमाने (सहा.अभियंता),श्री.सुरेश करे(सहा.अभियंता), श्री.सागर शेळके(सहा.अभियंता),श्री.विठ्ठल केंगार(विभागीय सचिव),श्री.प्रविण कांबळे(उपाध्यक्ष पंढरपूर विभाग),यांचेसह महावितरण विभागीय कार्यालय तसेच पंढरपूर शहर ग्रामीण 1 व ग्रामीण 2 या उपविभागातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप मा.सोनवणे यांनी केले तर श्री.प्रविण कांबळे यांनी आभार मानले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *