👁 9 Views

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यानजीकच्या रेल्वे पुलाखाली अपघात… पुलाखाली पडलेल्या खडड्यांमुळे येथे वारंवार होताहेत अपघात..!

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 14 October 2017

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यानजीकच्या रेल्वेपुलाखाली आज दुपारी अपघात झाला. कारचालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
बघा व्हिडीओ 

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून समजलेली माहिती अशी की, या पुलाखालील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एका स्कुटीचालक युवतीचे गाडीवरील नियंत्रण चुकले आणि या युवतीसह स्कुटीवर मागे बसलेली महिला खाली पडल्या. मागे येणार्‍या कारचालकाने प्रसंगावधानाने आपल्या गाडीचा ब्रेक तत्परतेने लावल्याने मोठा अनर्थ टळला. कांही काळ येथील वाहतुक थांबल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघातात सदर युवती व महिलेला किरकोळ दुखापत झाली होती. या व सरगम चौकातील रेल्वेपुलाखालील खड्डे अपघाताला निमंत्रण देत असून येथे वारंवार लहान मोठे अपघात घडत आहेत. येथील खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *