पंढरपूर Live 26 October 2017
मतदार छायाचित्र यादी-पुनरीक्षण कार्यक्रम
दावे,हरकती-स्वीकारण्यासाठी
तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत
सोलापूर दि. 26 :- मतदार छायाचित्र यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे आणि हरकती स्वीकारण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत वाढवण्यात आली,असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कळवले आहे.
याबाबत उप जिल्हा निवडणूक अधिकारी एस.व्ही.धुमाळ यांनी प्रसिध्दी पत्रक दिले आहे.त्यात नमुद केले आहे की, मतदार यादयांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 3/10/2017 ते 3/11/2017 या दरम्यान जाहिर करण्यात आला होता पण आता दावे आणि हरकती स्वीकारण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात 3290 मतदार यादी भाग आहेत. प्रत्येक भागाकरीता 3290 मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तथापी NVSP व्दारे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची सुविधा आहे. मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी मतदार यादीत नाव समावेश करण्यासाठी नमुना 6, नाव वगळण्यासाठी नमुना7, तपशीलात बदल करण्यासाठी नमुना 8, विधानसभा मतदार संघातर्गत –पत्ता बदल करण्यासाठी 8-अ, असे अर्ज उपलब्ध आहेत. मतदारांनी सदरच्या अर्जाचा वापर करावा.
एकापेक्षा अधिक ठिकाणी किंवा अधिक वेळा मतदार यादीत नाव असल्यास ते वगळण्यासाठी नागरीकांनी अर्ज करावेत. मृत झालेल्या मतदारांचे नाव वगळण्यासाठी कुटुंबयांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे,असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




