👁 9 Views

अधटराव खुन प्रकरणातील आरोपी संतोष कानारेला 1 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी

कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व वारकरी बंधु-भगिणी व साधु-संताचे पंढरपूर लाईव्हच्या वतीने हार्दिक स्वागत..! 

पंढरपूर Live 28 October 2017
मोहोळ(तालुका प्रतिनिधी)


पंढरपूर येथील संतोष चंद्रकांत आधटराव खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपी संतोष कानारे याला आज मोहोळच्या न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती पाटील यांनी त्यास 1 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

     याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 25 ऑक्टोबर रोजी आरोपी संतोष कानारे याने आपला मित्र संतोष आधटराव यास मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे जमिनीच्या व्यवहाराचे खोटे कारण सांगून एम एच 12 ए एफ 6483 या सॅन्ट्रो कार मधून आणून शेजबाभूळगाव हद्दीतील कॅनॉल जवळ लघुशंकेसाठी गाडी उभी करून संतोष आधटराव हा लघु शंकेसाठी उभारला असता पाठीमागून ऊसाच्या कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून करून पळ काढला होता. 


याबाबतचा गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सपोनि निलेश बडाख, पो ना विलास रणदिवे, मुन्ना बाबर, विशाल गायकवाड, महेश कोळी, दत्तात्रय वाघमारे यांनी 48 तासात तपासाची चक्रे फिरवून संतोष कानारे यास गाडीसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा खून आपण व्याजाने घेतलेले पैसे वेळोवेळी देऊन सुद्धा परत पैशाची मागणी करून दमदाटी व मारहाण करत तसेच पत्नी वर वाईट नजर ठेवल्याचा राग मनात धरून हा खून केल्याची कबुली दिली आहे.

   आज दि 28 रोजी आरोपी संतोष कानारे याला मोहोळच्या न्यायालयात हजर केले असता तपासी अधिकारी निलेश बडाख यांनी आरोपीने गुन्ह्यात वापरलेला कोयता, आरोपीने गायब केलेला मयताचा मोबाईल व या गुन्ह्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे याची माहिती मिळविण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती तर आरोपीचे वकील मैनोदीन शेख यांनी सदर आरोपीचे एफ आय आर मध्ये नाव नमूद नाही अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून केवळ संशयातून कानारे यास अटक केल्याचा युक्तिवाद केला होता या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन आरोपीस दि 1 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावत असल्याचा आदेश न्यायमूर्ती पाटील यांनी दिला.

या खुनाच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश बडाख हे करत आहेत.
विठ्ठल॥ विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *