- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
कासेगाव (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे शिवप्रेमी तरुण मंडळ व भाऊसाहेब तालीम संघाच्या वतीने पंढरपूर येथील सौ सरजूबाई बजाज रक्तपेढी मध्ये रक्ताचा साठा संपत आल्यामुळे रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये 51 जणांनी रक्तदान केले
पंढरपूर येथील सरजूबाई बजाज रक्तपेढी मध्ये ज्या ज्या वेळेला रक्ताची कमतरता भासेल त्या त्या वेळेला कुठलाही मुहूर्त व कुठल्याही कार्यक्रमाचे नियोजन नसताना कासेगाव येथील तरुण रक्तदान हे म्हतवाचे समजून आपल्या रक्तामुळे अनेकांचे जीव वाचतात या समाजकार्याचे धेय्य लक्षात ठेवून ज्या ज्या वेळेला रक्ताची कमतरता भासेल आशा वेळेला वर्षातून किमान 3 ते 4 वेळा रक्तदान करत असतात आजचे रक्तदान कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी
अनिकेत देशमख सचिन देशमुख रणजित देशमुख संतोष जाधव मनोज कळकुंबे केतन देशमुख विकास ढवळे धनाजी कळकुंबे विशाल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
डॉक्टर आनंद खिस्ते वैद्यकीय अधिकारी बजाज रक्तपेढी पंढरपूर शिवप्रेमी ग्रुप आम्हाला वेळोवेळी रक्तदान करून आम्हाला सहकार्य करत आले
आज सुद्धा शिवप्रेमी ग्रुप ने रक्ताचा तुटवढा आहे म्हटल्यावर तत्परतेने रक्तदान करून सहकार्य केले त्याबद्दल आभारी आहे





