राष्ट्रवादी काँग्रेस युवती शहराध्यक्षपदी कु.चारुशिला कुलकर्णी यांची निवड
आपल्या निवडीबद्दल बोलताना कु. चारुशिला कुलकर्णी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, ‘‘मी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत व कार्यशील कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. माझी निवड करुन वरिष्ठांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपविली आहे, ती सार्थ करुन दाखविण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती च्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासोबतच पार्टीची संघटन शक्ती वाढवणे, जनसंपर्क वाढविणे व नागरिकांचे प्रश्न सोडविणे यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.’’
पंढरपूर Live 7 NOVEMBER 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती च्या शहराध्यक्षपदी पंढरपूर येथील कु. चारुशिला कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. जिजामाता कार्यालय, इसबावी येथे काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विविध सेलच्या पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी कु. चारुशिला कुलकर्णी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिपकआबा पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बळीरामकाका साठे, राजुबापु पाटील, युवराज पाटील, दिपक पवार, सरचिटणीस लतीफ तांबोळी, महिला अध्यक्ष मंदा काळे, विधी सेल अध्यक्ष अमरजीत गोडसे, युवती अध्यक्ष यशोदा ढवळे, सेवादल अध्यक्ष विक्रांत माने, विद्यार्थी राज्य उपाध्यक्ष संकेत ढवळे, संदिप मांडवे आदी उपस्थित होते.
आपल्या निवडीबद्दल बोलताना कु. चारुशिला कुलकर्णी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, ‘‘मी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत व कार्यशील कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. माझी निवड करुन वरिष्ठांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपविली आहे, ती सार्थ करुन दाखविण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती च्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासोबतच पार्टीची संघटन शक्ती वाढवणे, जनसंपर्क वाढविणे व नागरिकांचे प्रश्न सोडविणे यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.’’ 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




