युटोपियन शुगर्स च्या १७१११ व्या साखर पोत्याचे पूजन
पंढरपूर Live 8 NOVEMBER 2017
पंढरपूर Live 8 NOVEMBER 2017
मंगळवेढा प्रतींनिधी :- युटोपियन शुगर्स लि. पंतनगर कचरेवाडी.ता.मंगळवेढा.या कारखान्याच्या १७-१८या गळीत हंगामातील १७१११व्या साखर पोत्याचे पूजन सोलापूर जिल्ह्याचे आमदार व युटोपियनचे मार्गदर्शक प्रशांतराव परिचारक व पंजाब नॅशनल बँकेचे सर्कल हेड श्री भुटानी यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी पंजाब नॅशनल बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील,चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचे सह युटोपियन शुगर्स चे सर्व खाते प्रमुख,अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
या वेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, गळीत हंगाम १७-१८ मध्ये ६ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवलेले आहे. सदरच्या उद्दिष्टपूर्तीसाठी युटोपियन ची सर्व यंत्रणा सज्ज असून, सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने चालू आहे. ऊस उत्पादकांचा युटोपियन शुगर्स ने विश्वास संपादन केला असल्यामुळे कारखान्याकडे क्षमतेपेक्षा जास्त वाहनांची आवक होत आहे .ऊस उत्पादकांनी नोंद केलेला संपूर्ण उस गाळप केल्याशिवाय कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद केला जाणार नाही,तरी ऊस उत्पादकानी कारखान्यास सहकार्य करावे ,असे आवाहनही श्री परिचारक यांनी केले.
फोटो ओळी : युटोपियन शुगर्स च्या पहिल्या १७१११ व्या साखर पोते पूजन प्रसंगी वि.प.सदस्य प्रशांतराव परिचारक,पंजाब नॅशनल बँकेचे भुटानी, डोंबिवली नागरी सह. बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील ,हेमंत कुलकर्णी ,कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक ,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, सह सर्व खाते प्रमुख ,अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



