👁 6 Views

वाखरीच्या ओढ्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह! पोष्टमार्टेम रिपोर्टमध्ये खुन झाल्याचे स्पष्ट!

वाखरीच्या ओढ्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह! 
पोष्टमार्टेम रिपोर्टमध्ये खुन झाल्याचे स्पष्ट!



पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील वाखरी गावालगत असलेल्या ओढ्यावर आज एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची खबर पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंढरपूचे उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे, पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के.के. खराडे व पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सदर मृतदेह ताब्यात घेवून येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोष्टमार्टेम च्या रिपोर्टनुसार सदर अज्ञात इसमाला जखमी करुन त्याचा खुन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाखरी येथील शिवाजी मच्छिंद्र मदने यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात सदर घटनेबाबत खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पहाणी केली असता . वाखरी येथील ओढ्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. ज्याचे वय अंदाजे वय 30 ते 35 वर्ष आहे. सदर मृताच्या अंगावर काळी पॅन्ट व बनियन आढळून आला. त्याच्या गळ्यात व उजव्या हातात काळा गोफ घातलेला आढळला. त्याची दाढी वाढलेली होती. चेहर्‍यावर व गळ्यावर जखमेच्या खुना आढळून आल्या. सदर मृतदेहाची व आरोपींची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु पोष्ट मार्टेम रिपोर्ट नुसार सदर इसमाची हत्या झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ. कोळी यांनी दिली आहे.
हा मृतदेह कुणाचा व याचा खुन कोंणी व का केला याबाबतचा तपास पोलिस करत आहेत.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *