आत्मामार्फत मंगळवारी विक्रेता खरेदीदार संमेलन
पंढरपूर Live 25 NOVEMBER 2017
सोलापूर :- शेत मालास निश्चित बाजारपेठ मिळवण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 रोजी फडकुले सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता विक्रेता खरेदीदार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये आत्मा मार्फत स्थापन केलेल्या व विविध फळे व भाजीपाला, अन्नधान्ये उत्पादीत करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सदर शेतमाल विक्रीमध्ये काम करणारे खरेदीदार सहभागी होणार आहेत.
शेतकरी कंपन्या व खरेदीदार यांचेमध्ये चर्चा होऊन सामंजस्य करार करुन घेणे असा उद्देश आहे. या विक्रेता खरेदीदार संमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनामध्ये प्रमुख खरेदीदार म्हणून रिलाईन्स फ्रेश, एडीएम ॲग्रो इंडस्ट्रिज लातूर, ग्रॅंट थॅार्टन पुणे, दाळ मिल असोसिएशन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी, सर्व शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, शेतमाल विक्रीमध्ये काम करणारे खरेदीदार यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आत्मा नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




