👁 6 Views

हेळंब येथील श्री खंडोबा यात्रेतील कुस्ती स्पर्धोत लक्षवेधी लढती

तीन दिवशीय खंडोबा यात्रेची उत्साहात सांगता 

पंढरपूर Live 27 NOVEMBER 2017

परळी वैजनाथ (प्रतिनिधी, महादेव गीते)-  तालुक्यातील हेळंब येथे ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा महोत्सवानिमित्त प्रतिवर्षी रविवारी (दि.२६) नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्यात आलेल्या कुस्ती  स्पर्धोत नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. या कुस्ती स्पर्धोमध्ये 100 रूपया पासुन ते 5000/-  पर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. तसेच कुस्त्या पाहण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळाली.
      या कुस्ती स्पर्धोस बीड,लातुर, उस्मानाबाद, परभणी, या जिल्ह्यातुन पहेलवानांचा प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणच्या मल्लांनी सहभाग होता. यांच्यातील रोमहर्षक लढतीत प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. दिपक कराड यांनी विजय संपादित केला.डोळ्यांचे पारणे फेडणारे प्रेक्षणीय सामन्यांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. शिवाय 100, 500, 1000,1500, 2000, 5000 हजार रूपये बक्षीसांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
   या कार्यक्रमास  मा.जि.प.सदस्य संजय दौंड, बालाजी आंधळे,  माजी पंचायत समितीचे सदस्य मधुसुदन होळंबे, इंद्रजीत होळंबे, चेअरमन महादेव होळंबे,प्रा.डाँ.नागोराव पाळवदे, रामराव गित्ते, पद्माकर फड, राम पाळवदे,सुंदर आंधळे, रामप्रभु होळंबे, माऊली आंधळे, पो.कॉ.दिलीप गित्ते, बाबा होळंबे, श्रीराम होळंबे, बालासाहेब होळंबे,परळी तालुका कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे, पांगरी येथील मोहन मुंडे, संभाजीनगरचे पोलिस नाईक दत्रात्रेय गित्ते, परळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव गित्ते, नंदनजचे सरपंच अनिल गुट्टे, युवानेते मोहन होळंबे, दत्ता पाळवदे, धनु पाळवदे, सुधाकर होळंबे, भानुदास होळंबे, पद्माकर आंधळे,
 यमाजी होळंबे, लहुदास होळंबे,  हरिराम होळंबे, संदिप होळंबे, भास्कर आंधळे, तुकाराम होळंबे, शिवराज होळंबे निवृत्त आंधळे, भगवान पाळवदे, भगवान होळंबे, शिवाजी पाळवदे, रामेश्वर आंधळे, गोवर्धन आंधळे, दयाराम होळंबे, हे उपस्थित होते. पंच म्हणून प्रल्हाद आंधळे, बालाजी आंधळे, अंगद आंधळे रामचंद्र आंधळे, गणपत आंधळे यांनी काम पाहिले. संभाजी आंधळे यांनी समोलचन केले आहे. चित्तथरारक सामने पाहण्यासाठी तालुक्यातील विविध गावचे हजारों कुस्तीप्रेमींना उपस्थित होते. या कुस्तीचे सामने यशस्वी करण्यासाठी पपन होळंबे, भावड्या होळंबे, राजाभाऊ पाळवदे, हनुमंत होळंबे, सतीश होळंबे, राजाभाऊ आंधळे भीमराव आंधळे, कारभारि आंधळे,गौतम होळंबे, विश्वनाथ आंधळे, केशव होळंबे आदींनी परिश्रम घेतले.

तीन दिवशीय खंडोबा यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता      खंडोबा यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातुन भक्त दर्शनासाठी आले होते. तीन दिवशीय यात्रा उत्साहात झाली. शुक्रवारी
 सकाळी गावातुन खंडोबाची पालखी वाजत गाजत काढण्यात आली. यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषाने हेळंब परिसर दणाणुन गेले होते. पालखीचे ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी दर्शन घेतले. शोभेची दारु उडवणून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीवर भंडारा उधळण्यात आला.  ग्रामस्थ पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते. शनिवारी वाघ्या मुराळ्याचा कार्यक्रम झाला. रविवारी कुस्त्यांची स्पर्धा घेण्यात आली. यावेळी चोेख पोलिस बंदोबस्त होता. यात्रेनिमित्त खेळणीचे दुकाने थाटली होती. 


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *