👁 8 Views

विंदायन ने झाले पंढरपूरकर मंत्रमुग्ध



पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017

   पंढरपूर/प्रतिनिधी
     येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने व प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल शहा यांच्या सहकार्यातून विंदा करंदीकर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त ‘विंदायन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात रजनीश जोशी, विद्या लिमये, गुरुराज जोशी,व शंतनू कोर्टीकर यांनी विंदांच्या आठवणी, त्यांच्या कविता यांचे गायन व वाचन केले. रजनीश जोशींच्या निवेदनाने व विद्या लिमये यांच्या सुरेख आवाजाने पंढरपूरकर मंत्रमुग्ध झाले . त्यांच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तुकाराम आणि शेक्सपियर यांची भेट हि कविता सादर केली. त्याच बरोबर माझ्या मना बन दगड या कवितेने सर्वाना गंभीर केले. मर मर मर मरा.
कर कर कर करा
या कवितेने हि टाळ्या घेतल्या.
      येथील नाथ चौकातील कवठेकर प्रशालेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी भागवताचार्य वा. ना. उत्पात हे होते. तर डॉ. द.ता.भोसले, मिलिंद परिचारक, नितीन रत्नपारखी,प्रा.दामोदरे, नाना रत्नपारखी, एस पी कुलकर्णी, सिद्धार्थ ढवळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. अशा या सुंदर कार्यक्रमाची सांगता विंदांच्या देणाऱ्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, देता देता एक दिवस, घेणार्याचे हात घ्यावे या कवितेने करण्यात आली.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.द ता भोसले यांनी केले. त्यात त्यांनी मसाप पंढरपुर शाखेचे कार्य विशद केले. व विंदांचा जीवनपट उलगडून दाखवला. सूत्रसंचालन लेखक अंकुश गाजरे यांनी केले तर आभार मसाप चे प्रमुख कार्यवाह कल्याणराव शिंदे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा धनाजी चव्हाण, मकरंद रत्नपारखी, व गणेश गायकवाड, राजेंद्र गिड्डे, व  यांनी कष्ट घेतले.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *