पंढरपूर Live 4 December 2017
पंढरपूर- पंढरपूर नगर परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत दि.अ.यो-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटाकरिता आर्थिक साक्षरत शिबीरचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ.साधनाताई नागेश भोसले यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ. अर्चनाताई नवनाथ रानगट, सौ.रेणुकाताई धर्मराज घोडके, सौ.रेहानाताई इब्राहीम बोहरी व नगरसेवक श्री. सुजितकुमार सर्वगोड , वस्तीस्तर संघाचे अध्यक्ष सौ. वैशाली माने, प्रशासन अधिकारी श्री शरद कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक श्री.वाघमारे, बँक ऑफ इंडियाचे सा.व्यवस्थापक सौ.स्मिता सदाफुले व विमा सल्लागार श्री.गोरख मेटकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी बँक ऑफ इंडियाचे व. सा.व्यवस्थापक सौ.स्मिता सदाफुले यांनी उपस्थित बचत गटातील
महिलांना संबोधित करताना बचतीचे महत्व, शासनाच्या विविध बचत योजना, स्वस्थ विमा योजना, आर.डी., सुकन्या योजना, अटल पेन्शन योजना, जनधन योजना व बचत गटाचे कर्ज प्रकरण विषयी मार्गदर्शन केले. तसेच गोरख मेटकरी यांनी विविध विमा योजनांविषयी संबोधित केले. श्री.शरद वाघमारे यांनी स्वच्छता अभियान अॅप व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. तसेच व्यवस्थापक श्री.योगेश काळे यांनी गटाच्या फिरता निधी वापरासंबधी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी नगरपरिषद कर्मचारी श्री संजय अंबिके, सौ.सुजाता राउत, सौ.ज्योती पवार,
सौ.अभंगराव, पोपट जाधव,संजय कुलकर्णी , रागु अभंगराव, मंदार कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.योगेश गंगाधरे, सहा.प्रकल्प अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन
श्री. सचिन सरवदे, समूह संघटक यांनी व्यक्त केले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





