निलेश चाळक बीड-ऊसाला २६०० रुपये प्रतिटन भाव द्यावा व उत्पादकांची पिळवणूक थांबवावी या मागणीसाठी येथे शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. तिन्ही कारखान्यांकडे जाणारे ऊसाचे ट्रॅक्टर अडवून पदाधिकाऱ्यानी रोष व्यक्त केला. शिवाय संघर्ष समितीच्या बैठकीत ऊसदरप्रश्नी शुक्रवारी (दि. ८) आ. आर. टी. देशमुख यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
महिनाभरापासून तालुक्यात ऊसदर व इतर प्रश्नांवर आंदोलन सुरु आहे. शिवसेना, शेकाप व इतर सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन आता शेतकरी संघर्ष समिती गठित केली असून त्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे. मंगळवारी विविध पक्ष- संघटनांचे पदाधिकारी एकवटले. अवघ्या अर्ध्या तासाच्या बैठकीत ऊसदरप्रश्नी करावयाच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. तालुक्यात माजलगाव सहकरी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना व खासगी तत्वावर जयमहेश कारखाना चालविला जातो. या तिन्ही कारखान्यांना ऊसाचे एक टिपरूही न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीनंतर तिन्ही कारखान्यांकडे ऊस घेऊन जाणारी वाहने पदाधिकाऱ्यानी रोखली. त्यानंतर तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत एकही कारखाना चालू देणार नाहीत असा टोकाचा इशारा देण्यात आला आहे. ऊसदर आंदोलन पेटलेले असताना अद्याप आ. देशमुख यांनी याची दखल घेतलेली नाही. त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
शिवाय येत्या शुक्रवारी (दि. ८) रोजी आ. देशमुख यांच्या निवासस्थानी संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. यावेळी भाई गंगाभीषण थावरे, शिवसेनेचे डॉ. उद्धव नाईकनवरे, धम्मानंद साळवे, अॅड. नारायण गोले, भाजपचे नितीन नाईकनवरे, हनुमंत कदम, राजेंद्र होके, अशोक नरवडे, पापा सोळंके, चंद्रकांत शेजूळ, नारायण होके आदी उपस्थित होते.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






