महाराष्टाचा मानबिंदू स्व.यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र, राष्ट्रवादी कॉग्रेसचे संस्थापक शरदचंद्र पवार यांनी आपल्या आता पर्यंतच्या वाटचालीत कष्टकरीपिडीतांचे अश्रू पुसण्याचे,त्यांना न्याय आणि सन्मान मिळवून देण्याचे कार्य केले आहे आणि आजही वयाच्या 77 व्या वर्षीदेखील ते तरुणांना लाजवेल असे काम सर्वसामान्य जनतेचे दु:ख दूर करण्यासाठी करीत आहेत.आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर राष्ट्रवादी कॉग्रेस व पंढरपूर तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने दत्त घाट येथील या निराधारांना आधार देण्याचा,त्यांना ब्लॅकेट वाटून मायेची उब देण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहीती शहराध्यक्ष सुधीर भोसले व अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष गुलाब मुलानी यांनी दिली आहे.
राष्ष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील,आप्पासाहेब जाधव व जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर सुडके,शहर सचिव विजय काळे,राष्ट्रवादी कॉग्रेस विधानसभा मतदार संघ अध्यक्ष दिपक वाडदेकर,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे,राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी विभाग पंढरपूर तालुका अध्यक्ष गुलाब मुलाणी,ओबीसी विभाग शहर अध्यक्ष अनिल सप्ताळ,राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गुरुराज अभंगराव,राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्षा साधना राऊत,जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती माळी,राष्ट्रवादी महीला कॉग्रेसच्या शहराध्यक्षा रंजना हजारे, राष्ट्रवादी युवक कॉग्र्रेसचे जिल्हा सरचिटणीस अतिक मुलाणी, जिल्हा अल्पसंख्याक शहर अध्यक्ष रशीद शेख,सलीम मुलाणी,अतिक मुलाणी,सागर कावरे,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे पंढरपूर शहर कार्याध्यक्ष अभिजीत साळुंखे,राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्षा चारुशिला कुलकर्णी,ओबीसी सेल तालुकाध्यक्षा जयश्री माडगूळकर,किसान सभा तालुकाध्यक्ष कृष्णा माळी,सांस्कृतीक सेलचे दिपक नाईकनवरे,कला व क्रिडा सेलचे अजय जाधव,मोहसिन मुलाणी,सुहास कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.