पंढरपूर Live 13 December 2017
पंढरपूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व हातकणंगले लोकसभा मतदार संघातील खासदार राजू शेट्टी यांनी श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर अर्थात ‘स्वेरी’मधील प्रत्येक महाविद्यालयांना प्रत्यक्षात सदिच्छा भेट देवून सविस्तर माहिती जाणून घेतली. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी खा. शेट्टी यांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले. प्रा यशपाल खेडकर यांनी स्वेरीच्या यशस्वी वाटचालीबाबत सविस्तर माहिती दिली. शैक्षणिक विश्वात सोलापूर जिल्ह्यात कॅम्पस प्लेसमेंट,वार्षिक परीक्षामधील निकाल आणि प्रवेश संख्या या तीनही महत्वाच्या क्षेत्रात अव्वल स्थान पटकाविल्याचे ऐकून खा. शेट्टी भारावून गेले. त्यांनी इमारतीच्या गच्चीवर बसविलेल्या रुफ टॉप सोलार सिस्टम द्वारे निर्माण होत असलेल्या उर्जा निर्मिती प्रकल्पांना भेट दिली.
विद्युत पर्यवेक्षक संतोष जाधव यांनी सोलार उर्जेद्वारे होत असलेले फायदे व होणारी बचत याची सविस्तर माहिती दिली.त्यानंतर संशोधन विभागातील सर्व प्रकल्पांना खा. राजू शेट्टी यांनी भेट दिली असता संशोधन तसेच त्यासाठी आलेला निधी व त्या संशोधनातून ग्रामीण जनता व शेतकरी यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा यांची माहिती अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी दिली. प्रा.एम.एम.पवार यांनी वसतिगृहाची माहिती दिली असता खा. शेट्टी यांनी ‘अत्यंत अवघड काम सहजरित्या करत असलेल्या प्रा. पवार यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी आऊटरीच सेंटर, मध्यवर्ती ओपन अँम्फी थिएटर आदी महत्वाच्या भागांना भेट देवून माहिती जाणून घेतली.आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणाले, ‘ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी बांधवांच्या घराघरापर्यंत ज्यांनी तंत्र शिक्षण पोहचवले त्या डॉ. बी.पी.रोंगे सर यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांची दूरदृष्टी शिस्त, आदरयुक्त संस्कृती, विद्यार्थी शिक्षण व संशोधन संबंधी प्रयोगशीलता वाखाणण्याजोगी असून या शिक्षण विषयक निष्ठेमुळेच हे नंदनवन निर्माण झाले आहे.’ यावेळी त्यांच्या समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विष्णूभाऊ बागल, तानाजीराव बागल, नवनाथ माने, रणजीत बागल, सचिन पाटील, संभाजी शिंदे,माजी सरपंच शिवाजी आसबे व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







