👁 8 Views

बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या:गेवराईत शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

पंढरपूर Live 13 December 2017

 निलेश चाळक बीड –बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या, उसाला २५०० रुपये पहिला हप्ता द्या, शेतकर्‍यांचे विज कनेक्शन तोडू नका, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे यासह शेतकर्‍यांच्या अन्य मागण्या घेऊन गेवराई तहसीलवर शिवसेनेचा शेतकरी महाआक्रोश मोर्चा आज धडकला. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात गेवराई तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांनी उपस्थिती दर्शवून सरकारविरोधात आक्रोश मांडला. या वेळी राज्य सरकारच्या धोरणाविरोधात मोर्चेकर्‍यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. 

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे पीक घेतले जाते. यावर्षी पाऊस चांगला झाला, परंतु बोंडअळीने शेतकर्‍यांच्या कापसाला शेतातच उद्ध्वस्त केले. त्यामुळे लागवड-मशागतीचा खर्चही शेतकर्‍यांच्या हाती आला नाही. एकीकडे निसर्ग शेतकर्‍यांना साथ देत नसताना दुसरीकडे राज्य सरकारही  शेतकर्‍यांच्या हिताच्या घोषणा करतो, परंतु प्रत्यक्षात शेतकर्‍यांना मदत करत नाहीत. संतापलेल्या शेतकर्‍यांचा आक्रोश सरकार दरबारी मांडण्यासाठी आज गेवराई तहसीलवर माजी मंत्री बदामराव पंडितांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा शेतकरी महाआक्रोश मोर्चा निघाला. बदामरावांच्या निवासस्थानापासून हा मोर्चा डॉ. आंबेडकर चौक, शास्त्री चौक, दाभाडे गल्ली मार्गे, तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. या वेळी मोर्चेकर्‍यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. 
बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या, उसाला २५०० रुपये पहिला हप्ता द्या, शेतकर्‍याचे वीज कनेक्शन तोडू नका, सरसकट कर्जमाफी करा या मागण्यांसह अन्य मागण्यांचं निवेदन प्रशासनातील अधिकार्‍यांना देण्यात आले. मोर्चासाठी तालुक्यातून हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकर्‍यांबरोबर शिवसैनिकांनीही सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या मोर्चाला जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह यामध्ये राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यासह, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जि प सभापती युधाजित पंडित, पं. स. सभापती अभयसिंह पंडित, युवानेते रोहित पंडित, पसभापती भीष्मांचार्य दाभाडे,प.स.सदस्या पुजाताई मोरे,महिला आघाडीच्या संगीता चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख अजय दाभाडे, जि.प.सदस्य बप्पासाहेब तळेकर, बाबुराव जाधव,युवराज डोंगरे, माजी सभापती पंढरीनाथ लगड, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र बेदरे, पं. स.सदस्य बापूराव चव्हाण,एड श्रीहरी वराट, शामराव राठोड,अशोकराव मोरे, विश्वनाथ सोनवणे, शेख एजाजभाई, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजा,मुकुंद बाबर, अमोल करांडे, आजमखान पठाण, रवींद्र बोराडे, प्रवक्ते दिनकर शिंदे, सरपंच प्रकाश शिंदे, बंडूआप्पा घोलप, सय्यद मुस्ताकिंम, शिनुभाऊ बेदरे, भाऊसाहेब माखले,सर्जेराव भांडागळे,सतीश सपकाळ, बदाम पौळ,सरपंच यहिय्या पटेल, सर्कलप्रमुख मगनमामा चव्हाण, संभाजी नाटकर,धर्मराज आहेर, रामभाऊ येवले, भैय्यासाहेब नाईकवाडे,कालिदास नवले,बंडू घोलप, बबलू खराडे, साहिल देशमुख, बद्रीनाथ लोणकर, संतोष पारीख, मुक्ताराम आव्हाड, सय्यद ,शेख मोहसीन, शेख हकीम, शेख रङ्गिक,विनायक पवार,यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.





14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *