पंढरपूर Live 15 December 2017
सोलापूर दि :- 15: पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट राष्ट्रीयीकृत बँकांनी पूर्ण करावे, अशा सूचना आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात आज जिल्हास्तरीय बॅंकर्स समन्वय समितीची बैठक झाली. त्याबैठकीत हा आराखडा प्रसिध्द करण्यात आला. यावेळी भारतीय रिझर्व्ह बॅकेचे सरव्यवस्थापक मोहन सांगवेकर डीआरडीएचे प्रकल्प संचालक ए.जी. नवाळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदिप झिले, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, अग्रणी बॅक व्यवस्थापक सुरेश श्रीराम आदी उपस्थित होते.
या बैठकीत खरीप आणि रब्बी हंगामासाठी पिक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी समाधानकारक नाही. बँका जर पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करणार नसतील तर बँकांची सरफेसी कायद्याखालील प्रकरणांवर जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
ज्या राष्ट्रीयीकृत बँकांनी खरीप पीक कर्ज वाटपात समाधानकारक कामगिरी केलेली नाही, अशा बँकांनी रब्बी पीक कर्ज वाटपात आता गतीने काम करावे असे, आदेश डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दिले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील किती शेतक-यांना किती रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. याची माहिती दररोज जिल्हा उपनिबंधकांना सादर करायला हवी. ती माहिती राष्ट्रीयीकृत बँकांनी द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.
मुद्रा योजना आणि स्टँडअप इंडिया योजनेतील कर्जदारांना सर्व बँकांनी त्यांची कागदपत्रे तपासून कर्ज द्यावे. स्टॅंडअप इंडियात जिल्ह्यात 660 प्रकरणे करायची होती पण त्या तुलनेत फारच कमी प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. मुद्रा बँक योजनेत कर्जदारांना बँकेत खाते नसले तरीही कर्ज देण्यात यावे, अशा सूचना श्री. भोसले यांनी दिल्या.
केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुल योजनेत जिल्ह्यात 50 हजार बँक खाते उघडणे अपेक्षित होते. पण अद्याप 36 हजार खाती उघडण्यात आली आहेत. तरी याबाबत कार्यवाही करावी, असे श्री. ए.जी. नवाळे यांनी सांगितले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







