पंढरपूर Live 17 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- ‘‘माझ्या वयाच्या 24 व्या वर्षापासून मी राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रीय झालो. तेंव्हापासून आमदार परिचारक गटामध्ये एकनिष्ठतेने कार्यरत आहे. पंढरपूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर माझी नियुक्ती करुन कार्य करण्याची संधी आमच्या नेत्यांनी दिली तर नक्कीच या संधीचे सोने करुन दाखविन.’’ असे सांगत आपण परिचारक गटाकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छूक आहोत. अशी माहिती प्रभाग क्र. 1 मधील परिचारक गटाचे खंदे समर्थक भाऊसाहेब शिंदे-नाईक यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
आपण गेल्या अनेक वर्षापासून परिचारक गटामध्ये सक्रीय राहून आमचे नेते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक, आमदार प्रशांतराव परिचारक व पंढरपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेशराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात सक्रीय राहून प्रामाणिकपणे कार्य करत आहे. आमचा प्रभाग क्र. 1 मधील नागरिकांच्या विविध प्रश्नांना सोडविण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून कार्य करण्याची संधी मिळेल ही अपेक्षा आहे. आ. परिचारक यांचा गट मजबुत करण्यासाठी कार्यकर्त्यांची मजबुत फळी आमच्या भागातून निर्माण झालेली आहे. या कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी व प्रभागातील उर्वरीत विकासकामे पुर्णत्वास नेण्यासाठी माझी स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्क्ती करावी अशी विनंती मी आमच्या नेत्यांकडे करणार असल्याची माहिती भाऊसाहेब शिंदे-नाईक यांनी दिली आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या विद्यमान स्वीकृत नगरसेवकांचा एक वर्षाचा कार्यकाल लवकरच संपणार असल्याने नविन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती दोन्ही आघाडयांकडून होणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने आ. परिचारक गट व आ. भालके गट या दोन्हीकडील इच्छूकांनी वेगवेगळ्या पध्दतीने यासाठीची आपली ‘फिल्डींग’ लावण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आता नेत्यांकडून स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागुन आहे.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर