पंढरपूर Live 17 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील निकृष्ट दर्जाची कामे करणार्या ठेकेदाराची चौकशी होऊन त्याच्यावर कडक कारवाई करा! जोपर्यंत संबंधीत ठेकेदाराकडून ही कामे उच्च दर्जाची व नियमानुसार पुन्हा नव्याने करुन दिली जात नाहीत तोपर्यंत त्याचे बील अदा करु नये! अशी मागणी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
पंढरपूर शहरातील जुनी नगरपालीका, आपटे हायस्कुल ते सरकारी तालीम, भजनतास चौक ते बाराभाई तालीम गोविंदपूरा, कोळीगल्ली व पंढरीतील इतर नव्याने होणार्या डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. याची चौकशी करुन संबंधीत ठेकेदारावर कडक कारवाई करावी. पंढरपूर नगरपरिषदेचे नगरअभियंता दिनेश शास्त्री यांना मी स्वत: निकृष्ट दर्जाची कामे झालेल्या येवून खरंच ही कामे निकृष्ट दर्जाची केली आहेत की नाही असे आवाहन केले होते. परंतु या ठिकाणी नगरपरिषदेचे इंजिनिअर जोशी हे आले व त्यांना प्रत्यक्ष ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे आपण निदर्शनास आणून दिले आहे. वरील ठिकाणी केलेली रस्त्याची डांबरीकरणाची कामे नियमानुसार झालेली नाहीत. डांबराऐवजी ऑईलमिश्रीत द्रव्याचा वापर रस्त्याच्या कामात केलेला आहे.
अशी निकृष्ट दर्जाची कामे करुन संबंधीत ठेकेदाराकडून पंढरीतील करदात्या नागरिकांची व शासनाची खुप मोठी फसवणुक झालेली आहे. या कामांची सखोल चौकशी करावी, पुन्हा नियमानुसार उच्च दर्जाची कामे केल्याशिवाय या ठेकेदारास त्याचे बील अदा करु नये व त्याच्यावर उचित ती कडक कारवाई करावी. अन्यथा आम्ही कोळी महासंघाचे वतीने नगरपालिकेच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करु! असा इशारा अरुणभाऊ कोळी यांनी मुख्याधिकारी अभिजीत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी कोळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी, सद्भावना बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजु शिंदे, विशाल नेहतराव, बापू शिंदे, लखन अभंगराव, गणेश परचंडे यांच्यासह कोळी महासंघाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








