👁 12 Views

महाराष्ट्र – विधानसभा कामकाजासंदर्भातील आजच्या महत्वाच्या बातम्या


पंढरपूर Live 18 December 2017
विधानसभा इतर कामकाज :
शालेय पोषण आहार पुरवठ्यातील
दर तफावतीची चौकशी करु
         शिक्षण मंत्री विनोद तावडे
नागपूरदि. 18 : शालेय पोषण आहारासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्याचे बाजारातील दर व प्रत्यक्ष होणाऱ्या पुरवठ्यातील दर यामध्ये तफावत असेल तर त्याची चौकशी केली जाईलअसे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.
आमदार सर्वश्री शरद सोनावणेसुनिल प्रभूसरदार तारासिंहसुनिल केदारॲड. राहूल कुल यांनी रायगड जिल्ह्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री श्री. तावडे म्हणाले कीरायगड जिल्ह्यामध्ये आहार शिजवण्यासाठी बचतगटामार्फत धान्य आणि इतर मालाची खरेदी करण्यासाठी ऑगस्ट २०१७ पर्यंत अनुदान जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आले आहे. इंधन व भाजीपाला यासाठी लागणारे ऑक्टोबर २०१७ पर्यंतचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच शाळांमध्ये आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनासाठी डिसेंबर २०१७ पर्यंत लागणारा निधी वितरीत करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील काही शाळांना तांदूळ पुरवठा उशीरा झाल्याने संबंधित पुरवठादाराकडून दंड आकारण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१७ पासून निविदा प्रक्रियेतून नियुक्त पुरवठादारामार्फत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा नियमीतपणे करण्यात येत आहेअशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
या चर्चेत आमदार सर्वश्री एकनाथराव खडसेशरद सोनावणेप्रकाश आबीटकरसुनिल केदार आदींनी सहभाग घेतला.    
००००


नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना
अधिवेशन कालावधीतच मदत जाहीर करु
         कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर
नागपूरदि. १८ : पूर्व विदर्भातील नागपूरभंडारागोंदीयाचंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ७ लाख १४ हजार ४२५ हेक्टरवर धानाची लागवड झाली आहे. काही ठिकाणी त्यावर खोड किडापाने गुंडाळणारी अळीतुडतुडेकरपाकडा करपा या कीडीचा तथा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आत मदत जाहीर केली जाईलअशी ग्वाही कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत दिली.
आमदार सर्वश्री राजेश काशीवारविजय रहांगडालेकृष्णा गजबेगोपालदास अग्रवाल आदींनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री श्री. फुंडकर म्हणाले कीधान पीकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहेत. हे पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना विम्यामार्फत तसेच केंद्र शासनाच्या एनडीआरएफमार्फत मदत उपलब्ध करुन देण्यात येईल. पूर्व विदर्भातील भात पिकांच्या पीक कापणी प्रयोगांची संकलित उत्पादकता आकडेवारी विमा कंपन्यांना देऊन या कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच किड व रोग या बाबींचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक आपत्ती तथा वैयक्तिक पंचनाम्यासाठी पात्र आपत्ती या प्रकारात करण्याबाबत केंद्र शासनास विनंती करण्यात आली आहेअशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
००००
हिवाळी अधिवेशन, नागपूर
दि. 18 डिसेंबर 2017
विधानसभा प्रश्नोत्तरे
 प्र.क्र. 103238
हाफकिन महामंडळ फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी
राज्य शासन प्रयत्न करणार
         गिरीश बापट
            नागपूर, दि. 18 : पोलिओ लस निर्मितीच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रेसर असलेली हाफकिन इन्स्टिट्यूट ही फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी अधिकचा निधी देऊन जागतिक स्तरावर क्रमांक एकची कंपनी बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
            सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी हाफकिन महामंडळात पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री. बापट म्हणाले की, पोलिओ निर्मूलनासाठी लस निर्मितीच्या कामात हाफकिनचे मोठे कार्य आहे. पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेत तांत्रिक मुद्यांची चौकशी करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नेमण्यात आली असून तीन महिन्यात या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त होईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी भाग घेतला.
000
प्र.क्र.  95891
द्वारपोच धान्य योजनेसाठी 29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर
         अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट
            राज्याच्या 29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करुन द्वारपोच धान्य योजना सुरु आहे. वाई येथे खासगी गोदामात सार्वजनिक वितरणाचे धान्य छापा टाकून जप्त केल्या प्रकरणाची पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
            वाई, जिल्हा सातारा येथे अवैध विक्रीकरिता पाठविण्यात येत असलेले धान्य जप्त केल्याबाबत सदस्य शंभूराजे देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. बापट म्हणाले की, वाई येथील औद्योगिक विकास महामंडळालगतच्या खासगी जागेतील पत्र्यांच्या शेडमधून 9 हजार 300 किलो गहू व 2 हजार 150 किलो तांदूळ असा माल संयुक्त कारवाईत पकडण्यात आला आहे.  या प्रकरणाची पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
            शिधापत्रिकांना आधार जोडणीच्या कामात सातारा जिल्हा पूढे आहे, असे सांगत श्री. बापट पुढे म्हणाले की 29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस यंत्रणेचा वापर करीत धान्य पुरवठा केला जात आहे.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, अजित पवार, भिमराव धोंडे यांनी भाग घेतला.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
००००
प्र.क्र.  102979
राज्यातील 23 पाणीपुरवठा योजनांसाठी
15 दिवसात कार्यारंभ आदेश देणार
         बबनराव लोणीकर
            राज्यातील 23 पाणीपुरवठा योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, 15 दिवसात त्यासाठी कार्यारंभ आदेश देऊन त्याचे काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
            मुक्ताईनगर-बोदवड-वरणगाव परिसरातील 81 गावांची पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत सदस्य एकनाथ खडसे यांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री. लोणीकर म्हणाले की, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील 51 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रस्तावास 5 डिसेंबर, 2017 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी कार्यारंभ आदेश आठ दिवसात देण्यात येतील. भुसावळ तालुक्यातील 31 गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकरिता 15 दिवसात कार्यारंभ देऊन दोन्ही योजना लवकरात लवकर सुरु करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात विलंब का झाला याची चौकशी अपर मुख्य सचिव पाणीपुरवठा विभाग यांच्यामार्फत केली जाईल, असेही श्री. लोणीकर यांनी सांगितले.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अजित पवार यांनी भाग घेतला.
००००
प्र.क्र.  96841
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत
राज्यात एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त
                                                        -गिरीश बापट
            राज्यात छूप्या मार्गाने विक्रीस उपलब्ध होत असलेल्या गुटख्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे. राज्यात केलेल्या कारवाईत आतापर्यंत एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.
            यासंदर्भात डॉ. संतोष टारफे, श्रीमती निर्मला गावीत, कुणाल पाटील, अमिन पटेल, डी. पी. सावंत, मंगलप्रभात लोढा यांच्यासह अन्य सदस्यांनी मुंबईसह राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात श्री.बापट यांनी म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी यासंदर्भात कारवाई केली जाते.
            सी.बी.कंट्रोल आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली असून, दि. 3 ऑक्टोबर, 2017 रोजी 28 लाख 87 हजार 150 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर 4 ऑक्टोबर व 10 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत अनुक्रमे 12 लाख 65 हजार आणि 9 लाख 31 हजार 460 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या लातूर कार्यालयाने 27 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत 42 लाख 12 हजारांचा प्रतिबंधीत अन्नसाठा जप्त केला आहे. मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे 10 लाख रुपये किंमतीचा परराज्यातून विक्रीस येणारा गुटखा जप्त करण्यात आला आहे.अशा प्रकारे सुमारे एक कोटी दोन लाख 96 हजार 210 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
००००

प्र.क्र.  97668
हाफकिनचे जळगांव युनिट बंद करणार नाही
                                                                        – गिरीश बापट
            जळगांव येथील हाफकिनचे युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.
            सदस्य सर्वश्री डॉ. सतीश पाटील, राहूल जगताप, प्रदीप नाईक आदींनी जळगांव येथील हाफकिन युनिट बंद करण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात श्री. बापट यांनी म्हटले आहे की, हाफकिन महामंडळाचे सहयोगी कंपनी असलेल्या हाफकिन अजिंठा फार्मा लिमिटेड, जि. जळगांव युनिटमध्ये केवळ क्षार संजीवनी, प्रतिजैवके, ज्वरनाशकाची औषधे, क्षयरोग औषधे, पोटदुखी व ॲलर्जीवरील औषधे यांचे उत्पादन करण्यात येते. या युनिटमध्ये पोलिओची लस अथवा इंजेक्शनचे उत्पादन केले जात नाही. हाफकिन व्यवस्थापकीय संचालक मंडळाकडून हाफकिनचे जळगांव येथील युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.
००००
अजय जाधव/
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
खुल्या बाजारातून वीस हजार कोटीचे कर्ज उभारणीसाठी
अनुमती देण्याची केंद्राकडे मागणी
         दिपक केसरकर
       नागूपरदि. 18 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 34 हजार 22 कोटी इतका निधी तातडीने द्यावयाचा असून खुल्या बाजारातून 20 हजार कोटीचे कर्ज उभारणीस अनुमती देण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आल्याचे वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
            सदस्य श्री.आनंदराव पाटील यांनी राज्यात कर्जमाफी जाहीर केल्यामुळे होणारी आर्थिक तूट दूर करण्याबाबत. केलेल्या उपाय योजनांर्गत प्रश्न विचारला होता. त्यावेळी श्री.केसरकर बोलत होते. श्री.केसरकर पुढे म्हणाले राज्यशासनाने अर्थसंकल्पित केलेला महसूल व खर्च याचे योग्य नियोजन करण्यासाठी मासिक निधी विवरणपत्र तयार करण्यात येते. त्यानुसार जमा होणाऱ्या निधी नुसार मासिक खर्चाचा अंदाज तयार करण्यात येतो. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मार्च मध्ये राज्यशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.
            केंद्रशासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीची शिफारस करण्याकरिता शासनाने के.पी.बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती गठित केली असून या समितीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध प्रकल्पांचे सुरु असलेल्या कामासाठी  आर्थिक कमतरता भासणार नाही. त्यासाठी आर्थिक नियोजन केले असल्याचे शेवटी श्री.केसरकर यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनिल तटकरेजयंत पाटीलसंजय दत्तश्रीमती हुस्नबानु खलिफे यांनी सहभाग घेतला.      



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
0000
रायगड जिल्ह्याच्या 243 कोटीच्या पर्यटन आराखड्याला लवकरच मंजूरी
-जयकुमार रावल
नागूपरदि. 18 : रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी 243 कोटींच्या विकास आराखड्याला लवकरच मंजूरी देणार असल्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सदस्य जयंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना विधानपरिषदेत सांगितले.
            श्री.रावल पुढे म्हणाले रायगड जिल्ह्यातील 59 गावांचा पर्यटन विकासाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने 243 कोटींची विविध कामे केली जाणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 5 लाख रु.वितरित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला पर्यटन आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार एकूण 12 जिल्ह्यांचे आराखडे अंतीम मंजूरीसाठी सरकारकडे आहेत. रायगड किल्ल्याचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी रायगड किल्ला प्राधिकरण स्थापित करण्यात येणार असल्याचे श्री.रावल यांनी शेवटी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत पर्यटन राज्यमंत्री श्री.मदन येरावार सदस्य सर्वश्री.सुनिल तटकरेप्रविण दरेकर यांनी भाग घेतला.
0000
अनाथ मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
          श्रीमती पंकजा मुंडे
       नागूपरदि. 18 : पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या बाल सुधारगृहात झालेल्या अल्पवयीन अनाथ मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल संबंधित कर्मचा-यावर गुन्हे दाखल केल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
            सदस्य ॲङ जयदेव गायकवाड यांनी लैंगिक शोषणाबद्दल प्रश्न विचारला होता. श्रीमती मुंडे म्हणाल्या लैंगिक शोषन प्रकरणी विभागीय उपआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठन करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरु केली असून काही कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. याप्रकरणात अडकलेल्या आठ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला असून त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात येणार आहे.
0000
 देवनार सिंचन प्रकल्पाच्या आराखड्यास मान्यता
          गिरीष महाजन
नागूपरदि. 18 : येवला तालुक्यातील देवनार सिंचन प्रकल्पाच्या सर्वसाधारण आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. असे जलसंपदा मंत्री श्री.गिरीष महाजन यांनी सदस्य हेमंत टकले यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात विधानपरिषदेत सांगितले.
            श्री.महाजन पुढे म्हणाले या सिंचन प्रकल्पाच्या अंदाजपत्रकासाठी क्षेत्रियस्तरावर आवश्यक प्राथमिक सर्वेक्षण व अन्वेषन पुर्ण झाले आहे. बुडित क्षेत्रातील वन जमीन संपादनासाठी आवश्यक संयुक्त मोजणी पुर्ण करण्यात आली आहे.  
0000
रोहयोच्या कामातील गैरव्यवहाराबद्दल ग्रामरोजगार सेवक निलंबित
          जयकुमार रावल
नागूपरदि. 18 : हिंगोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामात बनावट नावे टाकुन मजूरी घेतल्याबद्दल ग्रामरोजगार सेवकास निलंबित करण्यात आल्याचे रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी सदस्य रामराव वडकुते यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितले.
            या रोजगार हमी घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली असता काही प्रकरणात नियमबाह्य मजूरी प्रदान केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार ग्रामरोजगार सेवक हे दोषी आढळून आले व त्यांच्याकडून अतिप्रदानाची 962 रु. इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. गरज वाटल्यास उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल. असे श्री.रावल यांनी सांगितले.  यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडेअमरसिंह पंडीत यांनी भाग घेतला. 



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
00000
राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्ग
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर
                                                       – उद्योगमंत्री सुभाष देसाई
            नागूपरदि. 18 : महाराष्ट्र राज्याने उपलब्ध करुन दिलेल्या सोयी-सुविधा, अवलंबिलेले औद्योगिक धोरणउद्योगासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यां देण्यासाठी करण्यात आलेले सुलभीकरण या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी गुंतवणूकदार आकर्षित होत असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य ठरले आहेअसे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
            महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात प्रगतशील महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात उद्योग विभागाचे महत्व’ या विषयावर ते बोलत होते.
            श्री. देसाई पुढे म्हणालेमहाराष्ट्र राज्याने इज ऑफ डूईंग बिजनेस’ धोरणं अवलंबिले आहे. राज्यात उद्योग करण्यासाठी पूर्वी विविध प्रकारच्या 75 परवानग्या लागत असत. शासनाने या परवानग्याचे प्रमाण कमी करुन ते 25 परवानग्यांपर्यंत आणले आहेत. लागणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी मैत्रीकक्ष स्थापन करण्यात आला असून एका ठिकाणी विविध परवानग्या देण्यासाठी सिंगल विंडो पद्धत अवलंबिली आहे. विद्युत जोडणी 21 दिवसात देणे बंधनकारक केले आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज्यात देश-विदेशातील गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहे. आता देशातील सरासरी परकीय गुंतवणुकीमध्ये सरासरी 30 टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. मागच्या वर्षी देशातील एकूण परकीय गुंतवणूकीपैकी 50 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. देशाच्या विकास दरात 15 टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. औद्योगिक उत्पादनात 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. देशातील एकूण निर्यातीपैकी 35 टक्के निर्यात महाराष्ट्रातून होते. महाराष्ट्रात उद्योगासाठी पोषक वातावरण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.
              नव नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब महाराष्ट्र प्रथम करीत असते. नव्याने आलेल्या माहिती तंत्रज्ञानाची सुरुवातही महाराष्ट्रापासून झाली. मुंबईपुणे येथे माहिती तंत्रज्ञान केंद्र सुरु झाली. एमआयडीसी अंतर्गतही माहिती तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. मागासवर्गीय तरुणांना उद्योजक होता यावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामाजिक प्रोत्साहन योजना सुरु केली. यामध्ये 132 लाभार्थ्यांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे.
            नवीन उद्योजकांना नव नवीन कल्पनांच्या माध्यमातून उद्योग सुरु करण्यासाठी वेन्चर कॅपिटल (साहस निधी) माध्यमातून 300 कोटी रुपये भांडवल उभे केले असून या माध्यमातून नवीन उद्योजकांना 100 टक्के भांडवल देण्यात येत आहे. लघू उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. लघू उद्योग हे आपले सामर्थ्य असल्याचे ओळखून त्यांना पोषक असे वातावरण तयार केले आहे.
            महिला उद्योजक व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने महिला उद्योग धोरण जाहीर केले असून अशा प्रकारे महिला उद्योग धोरण जाहीर करणारे देशात पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्र कृषी प्रधान असला तरी पूर्वीपासूनच उद्योगाची कास धरल्यामुळे उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र प्रगतीवर आहेअसेही त्यांनी सांगितले.
            प्रारंभी विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला.
000
विष्णू काकडे/वि.सं.अ./18.12.17
राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्ग
विधीमंडळाच्या कामकाजाची माहिती
जनतेपर्यंत पोहोचविण्याची माध्यमांची जबाबदारी
                                                      – गजानन निमदेव
            नागूपरदि. 18 : विधीमंडळ हे जनमनाचा आरसा आहे. जनतेच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम विधींमंडळात करण्यात येते. विधीमंडळातील होणारे हे कामचर्चालोकांपर्यंत पोहोचविण्याची माध्यमांची जबाबदारी असतेअसे मत दै.तरुण भारत (नागपूर) चे संपादक गजानन निमदेव यांनी आज येथे व्यक्त केले.
            महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात विधीमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर ते बोलत होते.
            श्री. निमदेव पुढे म्हणाले कीलोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांना चौथा स्तंभ म्हटले जाते. विधीमंडळातील कामकाजाचे वृत्तसंकलन करताना पत्रकारांना काही संकेत पाळावे लागतात. ज्या घटना सभागृहात घडतात त्या तशाच द्याव्या लागतातन घडलेल्या घटनांचा तसेच शब्दांचा वापर करता येत नाही. असंसदीय शब्द कामकाजातून काढला जातो तेव्हा त्या शब्दांना प्रसिद्धी देऊ नये. तसेच विधीमंडळाचाविधान परिषद सभापतीविधानसभा अध्यक्षविधीमंडळातील सदस्य यांचा अवमान होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. सभागृहातील घटनांबरोबरच सकारात्मक नकारात्मक चर्चा लोकांपर्यंत पोहचविणे. त्या चर्चेचे फलित लोकांपर्यंत पोहाचविण्याची जबाबदारीही माध्यमांची आहे.   एखाद्या बाबीची सद्य:स्थिती सरकारला सादर करावयाची असल्यास श्वेतपत्रिका मांडली जाते. विरोधकांना हे मान्य नसेल तर त्यांच्याकडूनही पिवळी पत्रिका मांडतात. अशावेळी या बाबींची प्रसिद्धी जबाबदारीने आणि कौशल्याने करावी लागते. सभागृहातील गदारोळ याबाबतची माहिती सुद्धा कौशल्याने द्यावी लागते. कामाची माहिती देण्याबरोबरच विश्लेषण करण्याची जबाबदारी ही माध्यमांची असून हे करत असताना विधीमंडळाचा अवमान होणार नाही याची खबरदारी घेऊन प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीचे काम करावे लागतेअसेही त्यांनी सांगितले.  
            प्रारंभी विधीमंडळाचे अवर सचिव सुनिल झोरे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *