पंढरपूर Live 19 December 2017
युटोपियन शुगर्स लि.कचरेवाडी या कारखान्याने सुरुवाती पासूनच सामाजिक कार्यास प्राधान्य दिले आहे.दरवर्षी पारंपारिक मैदानी खेळ म्हणून जिल्हा स्तरीय आटया पाट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आटया पाट्या स्पर्धेचे शिस्तप्रिय व अचूक नियोजन तसेच आटया पाट्या प्रेमी यांचा उदंड प्रतिसाद पाहुन राज्यस्तरीय आटया पाट्या स्पर्धेचे आयोजन दिनांक २० ते २२ डिसेंबर २०१७ या कालावधीत करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली .
या वेळी बोलताना परिचारक म्हणाले की,कारखान्याचे मार्गदर्शक तथा विधान परिषद सदस्य प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसा निमित्त युटोपियन शुगर्स प्रशासना कडून दर वर्षी जिल्हास्तरीय आटया पाट्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मराठी मातीशी नाळ जोडलेला हा पारंपारिक खेळ असल्याने युटोपियन शुगर्स.आयोजित सामन्यास आटया पाट्या खेळाडू व आटया पाट्या प्रेमी यांचा उदंड प्रतिसाद आम्हास लाभतो. जेवणाची सोय,व भरगच्च बक्षिसे,सन्मान चिन्हे देवून सदरच्या खेळाडूंचा आम्ही गुण गौरव करीत असतो.या बाबींचा सोलापूर जिल्हा आटया पाट्या असोसिएशन यांनी दखल घेत युटोपियन शुगर्स ने आयोजित केलेल्या सामन्यास प्रत्यक्ष उपस्थित राहून युटोपियन शुगर्स चे कौतुक केले.व या बाबतची माहिती महाराष्ट्र राज्य आट्या-पाट्या महामंडळ, नागपूर यांना दिली. त्यांचे कडून ३२ वी पुरुष व२८ वी महिला सीनिअर यांच्या राज्यस्तरीय आट्या-पाट्या स्पर्धा युटोपियन च्या भव्य मैदांनावर आयोजित करण्या संदर्भात कारखाना प्रशासनाकडे मागणी केली.त्यास अनुसरून कारखाना प्रशासनाने स्पर्धेकरीता मंजुरी दिली आहे.
या वेळी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता सर्व जिल्हयामधून सुमारे ७०० खेळाडू उपस्थित राहणार असून त्यामध्ये सुमारे ३५०महिला खेळाडू उपस्थित राहणार आहेत.सर्व खेळाडू कोच,अधिकारी वर्ग या सर्वांची पंढरपूर येथून ते मैदाना पर्यंत नेण्याची व आणण्याची व्यवस्था,सामना कलावधीत नाष्टा,जेवणाची व राहण्याची व्यवस्था,आदींची उत्तमसोय प्रशासनाने केलेली आहे. त्याच बरोबर या स्पर्धा राज्यस्तरीय स्वरुपाच्या असल्याने प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी व्यवस्था, रात्री उशीरापर्यंत सामने सुरू राहत असल्याने भव्य लाईट व्यवस्था,स्वछता गृहाची सोय,प्रथमोपचाराची सोयही कारखाना प्रशासना कडून करण्यात आलेली आहे. या सामन्या मध्ये सोलापूर जिल्ह्याच्या खेळाडुंचे ड्रेस किट व सर्व खर्चाची जबाबदारी युटोपियन ने घेतलेली आहे.स्पर्धेचा उद्देश म्हणजे आटया-पाट्या हा पारंपरिक खेळ असल्याने त्यास ऊर्जित अवस्था आणणे हा आहे.सोलापूर जिल्ह्याचे नाव विशेषत:मंगळवेढा तालुक्याचे नाव आटया-पाट्या ची राजधानी म्हणून ओळखले जावी,ही आमची अपेक्षा आहे या करिता युटोपियन शुगर्स प्रशासन या स्पर्धेकरिता मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे.
या सामन्याचे उद्घाटन बुधवार दिनांक २०/१२/२०१७ रोजी दु ठीक ३.३० वाजता पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक यांचे शुभहस्ते व लक्ष्मणराव ढोबळे यांचे अध्यक्षते खाली करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे सामने चालणार आहेत.
स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. २२ रोजी सकाळी ठीक १०:०० वा॰ सोलापूर जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांच्या हस्ते व जि.प.बांधकाम व अर्थ समिति सभापती विजयराज डोंगरे यांचे अध्यक्षते खाली होणार असून, या कार्यक्रमास मा.आ.राजाभाऊ राऊत,चांदापुरी स.सा.कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर, मा.आ.शहाजी बापू पाटील उपस्थित राहणार आहेत. अंतिम विजेत्या संघास चषक ,प्रमाणपत्र ,व सर्व खेळाडुं करिता मेडल व मान्यवरांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे.
युटोपियन शुगर्स आयोजित आटया पाट्या स्पर्धा हा जिल्ह्याचा आकर्षणा चा विषय असतो.या राज्यस्तरीय आटया-पाट्या स्पर्धा चे जिल्ह्यात प्रथमच आयोजन होत असल्याने आट्या पाट्या खेळाडू, प्रेमी यांच्या साठी पर्वणी ठरणार असून सर्व आटया-पाट्या शौकीनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी केले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





