👁 10 Views

स्वेरीमध्ये झालेल्या वकृत्व स्पर्धेत शालेय गटात द.ह. कवठेकर प्रशाला प्रथम


पंढरपूर Live 20 December 2017
महाविद्यालयीन गटात केबीपी प्रथम तर स्वेरी द्वितीय
पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात पोलीस विभागातर्फे ‘डायरेक्टर जनरल्स युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप’ कार्यक्रम अंतर्गत पोलीस उपविभागीय शालेय गट  व महाविद्यालयीन गट असे स्वतंत्र वकृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीतून शालेय गटातून द.ह. कवठेकर प्रशाला तर महाविद्यालयीन गटात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

           वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच जनता व पोलीस यांच्यात असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणखी भक्कम व्हावे या हेतूने पोलीस महासंचालक (कोल्हापूर परिक्षेत्र) विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या विचार मंथनाद्वारे यावर तोडगा काढता येईल या उदात्त हेतूने सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक (ग्रामीण) वीरेश प्रभू व अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल अभियांत्रिकीत वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्वेरीच्या कॅम्पसमध्ये नेहमीप्रमाणेच याही स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वकृत्व स्पर्धेत जातीयवाद, गुन्हेगारी, वाढती व्यसनाधीनता, किशोरवयीन गुन्हेगारी, छेडछाड, ब्ल्यु व्हेल चॅलेंज, स्त्री अत्याचार या विषयावर स्पर्धकांनी आपले अदभूत विचार मांडले.यावर परीक्षकांनी काटेकोरपणे परीक्षण करून स्पर्धकांच्या विचारांवर परीक्षक जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे व प्रा. विक्रम बिस्किटे यांनी स्पर्धकांना प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांनाही स्पर्धकांनी समर्पक उत्तरे दिली. या स्पर्धेत यशवंत विद्यालय, कवठेकर प्रशाला, कला विद्या मंदिर सुस्ते, हनुमान विद्यालय सुपली, सी.बी.पाटील विद्यालय रोपळे, विद्यामंदीर प्रशाला उंबरे पागे या नी देखील उत्तम तयारी करून उपरोक्त विषयांचे सादरीकरण केले होते. परीक्षण, निरीक्षण व समिक्षणानंतर अखेर शालेय गटातून द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूलकरकंबने तर तृतीय पारितोषक देखील करकंबच्याच आदर्श प्रशालेने पटकाविले तर महाविद्यालयीन स्तरावर स्वेरीने दुसरा नंबर मिळविला. स्पर्धेतील विजेत्यांना पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा.पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, पंढरपूर शहरचे वरिष्ट पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह स्वरूपात बक्षीस वितरीत करण्यात आले. यातील विजेत्या स्पर्धकांना आता अधिक्षक स्तरावर असलेल्या स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वसतिगृह व्यवस्थापक प्रा.एम. एम. पवार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, प्रा.यशपाल खेडकर, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *