👁 10 Views

कर्मयोगी प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यास मंगळवेढा येथील डॉ.शरद शिर्के यांचे कडून २१००० रुपये ची देणगी.


पंढरपूर Live 21 December 2017
कर्मयोगी प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यास मंगळवेढा येथील डॉ.शरद शिर्के यांचे कडून २१००० रुपये ची देणगी.
    पांडुरंग परिवार व कर्मयोगी प्रतिष्ठान पंढरपूर आयोजित युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी.ता.मंगळवेढा.येथील दिनांक ७ जानेवारी २०१७ च्या सामुदायिक विवाह सोहळ्या करिता देणगी / मदती चा ओघ सुरू झाला असून, मंगळवेढा येथील शिर्के मॅटर्निटी होम चे डॉ.शरद शिर्के यांनी २१००० रु. चा धनादेश पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख सुधाकरपंत परिचारक यांचे कडे सुपूर्द केला.  सदर प्रसंगी दिनकर भाऊ मोरे,दिनकर भाऊ नाईकनवरे, सुरेश आगवाणे,मोहोळ तालुक्याचे बाबासाहेब पाटील डॉ.दीपक कवीश्वर, युटोपियन शुगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील आदी उपस्थित होते.
  सादर प्रसंगी कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, या वर्षीचा  विवाह सोहळा युटोपियन शुगर्स येथे आयोजित करण्यात आला असून सदर विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. सदर विवाह सोहळ्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून या वर्षी विवाह नोंदणी जास्त होण्याची शक्यता आहे. हा विवाह सोहळा युटोपियन च्या भव्य मैदानावर दिमाखदार वातावरणात तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर होणार असून इछूकांनी जास्तीत जास्त विवाह नोंदणी करून सहकार्य करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पाटील यांनी केले.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *