👁 9 Views

राज्यातील दुध उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान द्यावे – अजित पवार


पंढरपूर Live 22 December 2017
नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) – गोवा,कर्नाटक,मध्यप्रदेश आणि अन्य काही राज्यामध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते त्याप्रमाणे राज्यात दुध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेल्या दराबाबत सभागृहामध्ये चर्चा झाली त्यावेळी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अजित पवार यांनी वरील मागणी केली.

पाण्याची बाटली २० रुपयाला मिळते मग दुधाला कमी भाव का ? शेतकऱ्यांच्या दुधाला जास्त दर देण्याची गरज असून याबाबत शासनाने लवकरात लवकर बैठक लावावी आणि नवीन वर्षाची सुरुवात दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दयावा असेही अजित पवार म्हणाले. सरकार दुध उत्पादक शेतकऱ्यांना किंमत देत नाही, दुधाला दर देण्याबाबत सरकार फक्त तारीख पे तारीख देत आहे. सरकारने २७ रुपये दर जाहीर करुन देखील शेतकऱ्यांना २० ते २२ रुपये असा दर मिळत आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील दुध संघ बंद पडतील अशी भीती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आ. अजित पवार, आ. गणपतराव देशमुख, आ. वैभव पिचड, आ. भारत भालके यांनी भाग घेतला.


राज्यातील 50 दूध सघांना नोटीस देण्यात आल्या असून कमी दर देणाऱ्या

संघांवर राज्य शासन 79 अ अन्वये कारवाई करीत आहोत, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल – दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *