पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 26 December 2017
जखमीत ना. पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांचे
चुलत बंधू रामेश्वर मुंडे यांचा समावेश
निलेश चाळक अंबाजोगाई : शहाराजवळील अंबासाखर रोडवरील वळणावर भरधाव फोर्ड इंडेवर गाडी झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर अन्य ४ गंभीर जखमी झाले आहेत. जखमीत पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचे चुलत भाऊ रामेश्वर मुंडे यांचा समावेश आहे. हा अपघात रविवारी रात्री ९.४५ वाजता झाला.
रामेश्वर व्यंकटराव मुंडे हे अन्य चार जणांसोबत फोर्ड इंडेवर गाडीतून (एमएच १२ एनव्ही १२१२) अंबासाखर कडून अंबाजोगाईच्या दिशेने येत होते. तिरंगा हॉटेल समोरील वळणावर आले असता नियंत्रण सुटल्यामुळे गाडी एका झाडावर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता कि झाड एका बाजूला कलंडले आहे. या अपघातात गाडीतील धनराज कचरू बिडगर (वय ३४, रा. दाऊतपूर) यांचा मृत्यू झाला तर रामेश्वर व्यंकटराव मुंडे (वय ३५, रा. नाथरा), ज्ञानोबा नाथराव कराड (वय ३१, रा. इंजेगाव), विलास सोपान जाधव (रा. परळी) आणि परमेश्वर दवणे (रा. कौडगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामेश्वर मुंडे यांना गंभीर मार असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना लातूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अजय मुंडे, संजय दौंड, रमेशराव आडसकर, राजेसाहेब देशमुख, गणेश कराड, कमलाकर कोपले, सतीश केंद्रे आदींनी स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेतली. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. नितीन चाटे यांनी उपचारावर लक्ष ठेवले.
‘१०८’ धावली मदतीला
अपघात होताच घटनास्थळावर उपस्थित लोकांनी रुग्णवाहिकेस फोन लागत नसल्याने ‘विवेक सिंधु’ला अवघ्या १० मिनिटात अपघाताची माहिती दिली. ‘विवेक सिंधु’च्या वतीने तातडीने १०८ रुग्णवाहिकेवरील डॉ. सचिन कस्तुरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यावर डॉ. कस्तुरे यांनी चालक रमेश कांबळे यांच्यासह रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळ गाठले. तोपर्यंत काही युवकांनी तीन जखमींना रिक्षातून रुग्णालयात नेले होते. नंतर, उपस्थित लोकांनी गाडी झाडापासून बाजूला घेऊन आत अडकलेल्या रामेश्वर मुंडे यांना बाहेर काढून १०८ रुग्णवाहीकेतून आधी स्वाराती रुग्णालयात आणि नंतर जलदगतीने लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




