पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 30 December 2017
बीड जिल्ह्यात खळबळ:सोनवळा येथील घटना
लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन युवतीस पेटविले…
युवतीवर स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू
निलेश चाळक अंबाजोगाई : लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने इतर तिघांच्या साह्याने अल्पवयीन युवतीच्या घरात घुसून रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे घडली. या घटनेत सदरील युवती गंभीर भाजली असून तिच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रज्ञा ऊर्फे सोनाली सतिश मस्के (वय १७, रा. सोनवळा) असे या पिडीत युवतीचे नाव आहे. ती सध्या लोखंडी सावरगाव येथील महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिकत आहे. तिने जबाबात सांगितल्यानुसार तिचे आई वडील सध्या कुंद्री येथील साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेले आहेत. त्यामुळे ती सध्या आजी आणि दोन भावांसह सोनवळा येथेच स्वतःच्या घरी राहते. मागील आठवड्यात गावातीलच महादेव जालिंदर घाडगे या तरुणाने प्रज्ञाला लग्नासाठी मागणी घातली होती, परंतु तिने त्यास नकार दिला होता. दि. २६ डिसेंबर रोजी तिची आजी लाईट बिल भरण्यासाठी अंबाजोगाईला आली होती तर एक भाऊ शाळेत आणि एक भाऊ चुलत्याकडे गेलेला असल्याने ती घरी एकटीच होती. दुपारी ४ वाजताच्या सुमारास आरोपी बबन नरहरी मस्के, कविता जालिंदर घाडगे, महादेव जालिंदर घाडगे आणि सुवर्णा बबन मस्के हे चौघेजण तिच्या घरी आले. यावेळी महादेव घाडगे याने प्रज्ञास माझ्याशी लग्न करणार आहेस का असे विचारले. यावर प्रज्ञाने माझे वडील आणि चुलते यासाठी नाहीच म्हणणार आहेत आणि मी देखील तुझ्यासोबत लग्न करणार नाही असे सांगितले. त्यानंतर बबन मस्के व कविता घाडगे या दोघांनी घरामध्ये येवुन प्रज्ञाचे दोन्ही हात व महादेव घाडगे याने जवळच ठेवलेला दाब्ब्यातून तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि सुवर्णा बबन मस्के हिने काडी ओढून प्रज्ञाला पेटवून दिले. यानंतर चौघेही आरोपी तिथून पळून गेले. जीवाच्या आकांताने प्रज्ञाने आरडाओरडा केली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत पळत आले आणि त्यांनी प्रज्ञाला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले असे प्रज्ञाने जबाबात सांगितले आहे. या घटनेत प्रज्ञा ६१ टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. काल गुरुवारी तिचा पोलीस उपअधीक्षक यांच्यासमोर फौजदार देवकन्या मैंदाड यांनी तिचा इन कॅमेरा जबाब नोंदविला.
याप्रकरणी प्रज्ञाच्या जबाबावरून आरोपी बबन नरहरी मस्के, कविता जालिंदर घाडगे, महादेव जालिंदर घाडगे आणि सुवर्णा बबन मस्के या चौघांवर कलम ३०७, ३४ अन्वये धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले आहेत. फौजदार घोळे हे पुढील तपास करत आहेत.
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे




