पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 30 December 2017
पंढरपूर, दि. 30 :- अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील युवक स्वयंरोजगारात पुढे यावेत, त्यांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहता यावे,यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मौजे नजिक पिंपरी, ता.मोहोळ येथे बांधण्यात आलेल्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलांमुलीकरीता शासकीय शाळेचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमास पालकमंत्री विजय देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मोहोळ पंचायत समितीच्या सभापती समता गावडे-सोनटक्के, सरपंच रामचंद्र हळनूर, नगराध्यक्ष रमेश बारस्कर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त पी.एस. कवठे उपस्थित होते.
श्री. बडोले म्हणाले, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांनी उच्चपदस्थ नोकरी मिळवण्याबरोबच उद्योजक होवून आपली आर्थिक क्षमता वाढवली पाहिजे. तसेच शाहु, फुले, आंबेडकर यांचे विचार आपल्या देशात स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा विकास करणारे विचार असून, विद्यार्थ्यांनी याच विचाराचा वारसा पुढे चालवावा. प्रत्येक मागास व गरजू विद्यार्थ्यांनी निवासी शाळेचा उपयोग करुन स्वत:ला सक्षम करावे. विद्यार्थ्यांना निवासी शाळेतस्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक सोयी – सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच निवासासाठी वस्तीगृहाची आवश्यकता असते यासाठी सोलापूर शहरात दोन व सांगोला तालुक्यासाठी एक वस्तीगृह व्हावे तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत शैक्षणिक संस्थाकडे असलेल्या खाजगी वस्तीगृहाचे पुनर्जीवन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात एक वसतीगृह बांधण्यात येणारअसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे उपायुक्त पी.एस. कवटे यांनी केले. तर सहायक आयुक्त अमित घवले यांनी आभार मानले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे



